पूजा खेडकरचं UPSC ने तातडीने निलंबन का केलं नाही?, माजी निवडणूक आयुक्तांचं टीकास्त्र

पुजा खेडकर प्रकरणी यूपीएससीने सुद्धा स्वतःची जबाबदारी पार पाडली नाही. यूपीएससीच्या ज्या व्यवस्थेमध्ये पूजा खेडकर सुटली त्यांच्यावर कारवाई व्हावी, कुरेशी यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पूजा खेडकर प्रकरणात माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पूजा खेडकर प्रकरणात दोषी कोण? असं म्हणून एस वाय कुरेशी यांनी थेट यूपीएससीवर निशाणा साधला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एस वाय कुरेशी यांनी पुढे म्हटलं की, नियमानुसार पूजा खेडकरला तात्काळ सेवेतून काढता येऊ शकते. तसे अधिकार यूपीएससीला आहेत. प्रशिक्षण पूर्ण व्हायच्या एक दिवस आधीपर्यंत कोणतेही कारण न सांगता यूपीएससी उमेदवाराला सेवेत काढून टाकू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन निवाड्यात यूपीएससीच्या या अधिकाराला मान्यता मिळालेली आहे.  

(नक्की वाचा - पूजा खेडकरांवर UPSC ची सर्वात मोठी कारवाई; गुन्हा दाखल, नोकरीवरही टांगती तलवार)

असं असताना पूजा खेडकरच्या बाबतीमध्ये यूपीएससीने असं का केलं नाही? पूजा खेडकरला तात्काळ सेवेतन काढून टाकावं, असं देखील कुरेशी यांनी म्हटलं. पोलीस केस आणि त्यानंतरच्या कायदेशीर प्रक्रियेत वेळ जाणार आहे. न्यायालयातून पुजा पुन्हा सेवेत येऊ शकते. नैसर्गिक न्यायाचे तत्व इथे लागू होत नाही, असं कुरेशी यांनी म्हटलं. 

पुजा खेडकर प्रकरणी यूपीएससीने सुद्धा स्वतःची जबाबदारी पार पाडली नाही. यूपीएससीच्या ज्या व्यवस्थेमध्ये पूजा खेडकर सुटली त्यांच्यावर कारवाई व्हावी. पूजा खेडकर हे अचंबित करणारे प्रकरण आहे. एवढ्या वर्षाचे सनदी सेवेमध्ये असं कधी घडेल असं वाटलं नव्हतं, असं म्हणत कुरेश यांनी यूपीएससीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.  

Advertisement

(नक्की वाचा - दादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? 'तो'आमदार कोण?)

पूजा खेडकर प्रमाणेच काही मंडळी बनावट अपंग प्रमाणपत्र घेऊन सेवेत आले असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. आपल्या देशातले सनदी सेवक भ्रष्ट असले तरी 60 टक्के अधिकारी कार्यक्षम आहेत. या देशात होणाऱ्या निवडणुका हे त्याचे उदाहरण आहे, असं कुरेशी यांनी म्हटलं. 

Topics mentioned in this article