Mumbai News: Kiss केलं अन् चेन केली गायब; क्लबमध्ये महिलेसोबतची मैत्री व्यावसायिकाला महागात पडली!

फसवणुकीचे बळी ठरलेले व्यावसायिक 52 वर्षांचे तर आरोपी महिलेचे वय सुमारे 27 वर्षे आहे. किरण असं या आरोपी महिलेचं नाव आहे. 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मालाड येथील एका क्लबमध्ये दोघांची ओळख झाली होती. जिथे दोघांनी एकत्र डान्स केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Crime News: क्लबमध्ये महिलेसोबतची मैत्री एका व्यावसायिकाला चांगलीच महागात पडली आहे. महिलेने मैत्रीचे नाटक करून एका व्यावसायिकाला गंडा घातल्याचा प्रकार मुंबईतील मालाड परिसरातून समोर आला आहे. 1 नोव्हेंबर रोजी घडली असली तरी 15 नोव्हेंबर रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.

फसवणुकीचे बळी ठरलेले व्यावसायिक 52 वर्षांचे तर आरोपी महिलेचे वय सुमारे 27 वर्षे आहे. किरण असं या आरोपी महिलेचं नाव आहे. 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मालाड येथील एका क्लबमध्ये दोघांची ओळख झाली होती. जिथे दोघांनी एकत्र डान्स केला.

(नक्की वाचा-  Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)

लिफ्ट मागून केली चोरी

मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता व्यावसायिक घरी जाण्यासाठी क्लबमधून बाहेर पडले, तेव्हा त्या महिलेने त्यांच्यामागे जाऊन 'घरी सोडण्याची' विनंती केली. व्यावसायिकाने सहजपणे तिला लिफ्ट देण्याचे मान्य केले आणि आपल्या कारमध्ये बसवले.

गाडी सुरू झाल्यानंतर काही मीटरचे अंतर कापले जात नाही, तोच महिलेने चालू कारमध्येच व्यावसायिकाला आलिंगन देण्यास आणि  किस करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित प्रकारामुळे व्यावसायिक अस्वस्थ झाले आणि त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने गाडी थांबवली आणि त्या महिलेला उतरण्यास सांगितले.

Advertisement

(नक्की वाचा- Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; विधवा महिलांबद्दल म्हणाले...)

महिलेने चैन केली गायब

महिलेने गाडीतून उतरून लगेच पोबारा केला. ती निघून गेल्यावर व्यावसायिकाने स्वतःची तपासणी केली असता, त्यांच्या गळ्यातील सुमारे 75 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी व्यावसायिक पुन्हा क्लबमध्ये गेले आणि त्यांनी त्या महिलेला ओळखले. त्यानंतर त्यांनी  15 नोव्हेंबर रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी किरण हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून महिलेचा शोध सुरू केला आहे.