मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar Railway Accident CCTV Video : ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी जीव धोक्यात टाकून रेल्वे ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. पण रेल्वेचे नियम मोडल्यावर काही प्रवाशांचा रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अपघात होतो, परिणामी त्यांना जीवही गमवावा लागतो. काही तरूण रिल्स बनवण्याच्या नादात रेल्वे स्थानकांवर जीवघेणी स्टंटबाजीही करतात, असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पण पालघर रेल्वे स्थानकात सुदैवाने एका महिला प्रवाशाचा जीव वाचला आहे. ही महिला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला. त्याचदरम्यान, एका प्रवाशाने अलर्ट राहून घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेचे प्राण वाचवले. प्रकाश जाधव असं या महिलेचा जीव वाचवण्याऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पालघर रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
पालघर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नंबर 1 वर शनिवारी ही अपघाताची घटना घडली. एक प्रवासी महिला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा अपघात झाला. महिलेचा पाय घसरल्याने तिचा तोल गेला. पण त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रकाश जाधव यांनी धाडस दाखवून त्या महिलेला ट्रॅकखाली जाण्यापासून वाचवले. नाहीतर या महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
प्रकाश जाधव हे एसटी महामंडळाच्या पालघर डेपोत सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत. जाधव यांनी रेल्वे स्थानकावर महिलेचा जीव वाचवल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी प्रकाश यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. दरम्यान, प्रकाश जाधव यांनी प्रवाशांना मोठं आवाहन केलं आहे. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये,असं ते म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> Viral : माजी पंतप्रधानांचा किसिंग सीन व्हायरल! यॉटवर सिंगर कॅटी पेरीसोबत झाले रोमॅन्टिक, जगभरात उडाली खळबळ!
त्या रेल्वे स्थानकातही घडली होती धक्कादायक घटना
अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर चेन स्नॅचिंगची थरारक घटना घडली होती. मुकेश कोळी नावाच्या चोरट्याने चोरी करून रेल्वे ट्रॅकवर धूम ठोकली होती. पण दुसऱ्याच दिवशी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या चोराने लोकल लोकल ट्रेन येत असतानाच थेट रेल्वे ट्रॅकवर उडी मारली होती. पण पोलिसांनी त्या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडलं होतं. चोर आणि पोलिसांची फिल्मी स्टाईल घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. कल्याण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने या चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली होती.
नक्की वाचा >> Viral Video : रेल्वे प्रवाशांनो! घाई घाईत ट्रेन पकडताय? एस्केलेटरवर जाताना 'ही' चूक अजिबात करू नका, महिलेसोबत बघा काय घडलं..