BMW HIT AND RUN : पोलिसी खाक्या! मिहिर शेवटी बोललाच, रीक्रिएशनमध्ये धक्कादायक खुलासा

त्या अपघाताचे रीक्रिएशनही करण्यात आले. आरोपी मिहीर याने आपल्याकडून चुक झाल्याचे मान्य केले आहे. पण त्याने या प्रकरणातून सुटण्याचा एक मार्ग मात्र मोकळा ठेवला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

वरळी हिट अँड रन प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक केल्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. त्यानंतर तो पोपटा सारखा बोलू लागला आहे. त्याने जो कबुलनामा दिला आहे त्यावरून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो. शिवाय त्या अपघाताचे रीक्रिएशनही करण्यात आले. आरोपी मिहीर याने आपल्याकडून चुक झाल्याचे मान्य केले आहे. पण त्याने या प्रकरणातून सुटण्याचा एक मार्ग मात्र मोकळा ठेवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसां समोरही गुन्हा सिद्ध करण्याचे आता मोठे आव्हान आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वरळी प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर यांची समोरा समोर चौकशी करण्यात आली आहे. त्यात त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. मिहीर शहाने चौकशी दरम्यान आपल्याकडून मोठी चुक झाल्याचे मान्य केले आहे. कारने जेव्हा दुचाकीला उडवले त्यावेळी कारच्या बंपरमध्ये महिला अडकली होती हे ही त्याने मान्य केले आहे. पण ती महिला आपल्याला दिसलीच नाही असेही तो म्हणाला. शिवाय जे काही झालं आहे त्याचा आपल्याला पश्चाताप असल्याचेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले. दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणी पोलिसांनी रीक्रिएशन केले आहे. शिवाय ज्या बारमध्ये मिहीर मद्य पिण्यासाठी बसला होता त्या ठिकाणचे डिटेल्सही पोलिसांनी मिळवले आहेत.    
 

Advertisement

मिहीरचे तीनही मित्र 30 वर्ष आणि त्या पेक्षा जास्त वयाचे आहेत. शिवाय जे कागदपत्र मिळाले आहेत त्यानुसार मिहीरचे वय 23 वर्षे आहे. पण मिहीर ज्या बारमध्ये आपल्या मित्रां बरोबर मद्य घेण्यासाठी आला होता, त्यावेळी त्याने ओळखपत्र दाखवले होते. त्या ओळख पत्रानुसार त्याचे वर 27 वर्षे होते, अशी माहिती तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. याची चौकशीही पोलिस आता करत आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वादात अडकलेल्या IAS पूजा खेडकरांची पहिली प्रतिक्रिया, आजपासून वाशिम कार्यालयात रुजू!

हाजी आली इथे मिहीरने ड्रायव्हरकडून गाडी स्वताच्या ताब्यात घेतली. त्यानंतर तो स्वत:गाडी चालवत होता. चौकशी दरम्यान मिहीरनेही कबुल केले आहे की तोच गाडी चालवत होता. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मिहीरने आपला गुन्हा कबुल केला आहे. पण असं असलं तरी त्याने आपला वाचण्याचा मार्ग मात्र मोकळा ठेवला आहे.दरम्यान जरी मिहीर सांगत असला की त्याला बोनेट खाली महिला आहे हे माहित नव्हते. तर ते खोटे आहे असा दावा पोलिसांनी केला आहे. ज्या वेळी अपघात झाला त्यावेळी अजूबाजूला असलेली लोक त्याला थांबायला सांगत होते. पण तो थांबला नाही.  
 

Advertisement

चौकशी दरम्यान मिहीरने अजून एक गोष्टी स्पष्ट केली आहे. अपघात झाल्यानंतर तो घाबरला होता. घरातले लोक आता आपल्याला ओरडतील अशी भीती त्याला होता. त्यामुळे अपघातानंतर वडील त्या ठिकाणी पोहचण्या आधीच तो तिथून पळून गेला. त्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडचे गोरेगाव इथले घर गाठले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय आणखी काही पुरावे मिळतात का याचा शोध घेत आहेत. 

अपघात झाल्यानंतर तब्बल 60 तासानंतर आरोपी मिहीर शहाला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांचा तो मुलगा आहे. वरळी इथे अपघात केल्यानंतर तो फरार झाला होता. अपघात झाला त्यावेळी मिहीर नशे मध्ये होता. शिवाय तोच गाडी चालवत होता. त्यावेळ त्याच्या भरधाव कारने स्कुटरला जोरदार धडक दिली. ज्यांना धडक दिली ते प्रदीप नखवा (50) आणि त्यांची पत्नी कावेरी (45) हे कुलाब्याच्या ससुन डॉकमधून घरी परत येत होते. या अपघातात कावेरी यांचा जागेवरच मृत्यू झाला तर प्रदीप हे जबर जखमी झाले आहेत.