Titwala News : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवलं जीवन; VIDEO  शूट करून मांडली व्यथा 

Titwala News : सुमन शेंडगे आणि सचिन शास्त्री हे गेल्या दहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिन शास्त्री यांनी सुमनला लग्न करण्याचं आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

जाहिरात
Read Time: 1 min

अमजद खान, कल्याण

टिटवाळ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळ्यात प्रियकराच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय महिलेने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सुमन मच्छिंद्र शेंडगे असं मृत महिलेचं नाव आहे. तर सचिन शास्त्री असं प्रियकराचं नाव आहे.

सुमन शेंडगे आणि सचिन शास्त्री हे गेल्या दहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिन शास्त्री यांनी सुमनला लग्न करण्याचं आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने पाच वर्षांपूर्वी गायत्रीसोबत लग्न केले. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती सचिनच्या पत्नी गायत्रीला समजली.

यानंतर सचिनच्या कुटुंबाकडून आणि सचिनकडून सुमनला त्रास देण्यास सुरुवात झाली. नेहमी सुमनला फोन करून सचिन व त्यांचे कुटुंब वारंवार त्रास देत होते. अखेर सुमन मानसिकदृष्टया खचली होती. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी सुमनने आपल्याला झालेल्या त्रास व्हिडियोच्या माध्यमातून मांडला. या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी प्रियकर सचिन शास्त्रीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article