बलात्काराचा प्रयत्न करीत होता तोच...; वसईतील भटक्या कुत्र्यामुळे बचावली तरूणी

वसईतील तुंगारेश्वर भागात साधारण रात्री 1.30 वाजता एक भटक्या कुत्र्यामुळे महिला बचावली.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

वसईमधील तुंगारेश्वर भागात एका भटक्या कुत्रामुळे तरूणीचा जीव वाचला आहे. तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला या भटक्या कुत्र्याने चांगलाच धडा शिकवला. 

वसईतील तुंगारेश्वर भागात साधारण रात्री 1.30 वाजता एक भटका कुत्रा भुंकल्यामुळे एक 32 वर्षीय आरोपीने पळ काढला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 35 वर्षीय आरोपी संदीप खोत तुंगारेश्वर या भागातून जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करीत होता. मध्यरात्र असल्याने तिथं वर्दळ नव्हती. अंधाराचा फायदा घेत आरोपी तरूणीच्या मागून गेला. त्याने तिला जमिनीवर धक्का दिलं आणि तिथं तोंड बंद केलं. तो तिला बलात्काराची धमकी देऊ लागला. त्याचवेळी एका दुसऱ्या गल्लीतून भटका कुत्रा आला आणि तो आरोपीवर जोरजोरात भुंकायला लागला. यामुळे आरोपी घाबरला आणि त्याने तेथून पळ काढला. मात्र त्याने तरुणीच्या हातातला आयफोन खेचून घेतला आणि पळाला.

नक्की वाचा - साताऱ्यात भरवला जुगाराचा अड्डा; खेळणाऱ्यांना आयोजकांकडून दारू, मांसाहारी जेवणाची सोय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी तुंगारेश्वर गलीवरून जायगोट आयव्हीएफ सेंटरला पोहोचली, तेव्हा 25-30 वर्षाचा असलेला एक तरूण तिचा पाठलाग करू लागले. अचानक तो तिच्या समोर आला. तिला ढकललं. आणि बलात्काराचा धमकी देऊ लागला. त्याने महिलेच्या तोंडावर आपला हात ठेवला. आरोपी तरूणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत होता. याचवेळी एक भटका कुत्रा एका गल्लीतून आला आणि आरोपीवर भुंकू लागला. यानंतर त्याने महिलेला सोडलं. पळताना त्याने तरूणीचा आयफोन खेचून घेतला. कुत्र्याच्या भीतीने आरोपी तेथून पळाला. यानंतर तरूणीही धावत मुख्य रस्त्यावर आली.