Pune News: पुणे ZP निवडणुकीसाठी 73 गटांचे आरक्षण जाहीर, 'या' तालुक्यांत गट आरक्षित, पाहा संपूर्ण यादी

या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

सूरज कसबे 

पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 73 गटांच्या आरक्षणाची सोडत (Draw of Reservations) सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमुळे आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे. एकूण 73 गटांसाठी काढलेल्या या आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, अनुसूचित जातीसाठी (SC) 7 गट, अनुसूचित जमातीसाठी (ST) 5 गट, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी (OBC) 19 गट राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गातील 19 गटांपैकी 10 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी (General) सर्वाधिक 42 गट राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 20 गट महिलांसाठी आरक्षित आहेत.

नक्की वाचा - Ladaki bahin Yojana: आता 'या' संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध, दिवाळीचा हाफ्ता कधी जमा होणार?

जिल्हा परिषदेचे जाहीर झालेले आरक्षण गटनिहाय खालीलप्रमाणे:

1. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

  • * हवेली - 37 पेरणे
  •  * वेल्हे - 55 वेल्हे बुद्रुक
  •  * खेड - 25 मेदनकरवाडी
  •  * मुळशी -36 पिरंगुट
  •  * शिरूर - 20 मांडवगण फराटा
  •  * दौंड - 49 यवत
  •  * आंबेगाव - 13 अवसरी बुद्रुक
  •  * भोर - 56 वेळू

2. अनुसूचित जाती महिला (SC Women)

  • * इंदापूर - 71 लासुरने
  •  * इंदापूर - 70 वालचंदनगर
  •  * बारामती - 61 गुणवडी
  •  * हवेली - लोणीकाळभोर

3. अनुसूचित जमाती महिला (ST Women)

  •  * जुन्नर - 8 बारव
  •  * जुन्नर - 1 डिंगोरे
  •  * आंबेगाव - 9 शिनोली

4. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC Women)

  •  * खेड - 22 कडूस
  •  * बारामती - 60 सुपा
  •  * हेवली - 40 थेऊर
  •  * शिरूर - 15 न्हावरा
  •  * जुन्नर - 4 राजुरी
  •  * जुन्नर - 6 नारायण
  •  * जुन्नर - 2 ओतूर
  •  * पुरंदर - 53 नीरा शिवतक्रार
  •  * जुन्नर - 5 बोरी बुद्रुक
  •  * इंदापूर - 67 पळसदेव

5. सर्वसाधारण महिला (General Women)

  • * खेड - 23 रेटवडी
  •  * दौंड - 47 पाटस
  •  * बारामती - 63 वडगाव निंबाळकर
  •  * शिरूर - 19 तळेगाव ढमढेरे
  •  * इंदापूर - 69 निमगाव केतकी
  •  * मावळ - 31 खडकाळे
  •  * आंबेगाव - 11 कळंब
  •  * दौंड - 44 वरवंड
  •  * शिरूर - 18 शिक्रापूर
  •  * आंबेगाव - 10 घोडेगाव
  •  * मावळ - 30 इंदुरी
  •  * हवेली - 42 खेड शिवापूर
  •  * खेड - 26 पाईट
  •  * इंदापूर - 66 भिगवण
  •  * शिरूर - 16 रांजणगाव गणपती
  •  * खेड - 28 कुरुळी
  •  * मावळ - 33 सोमाटने
  •  * इंदापूर - 73 बावडा
  •  * पुरंदर - 50 गराडे
  •  * हवेली - 38 कोरेगाव मुळ

या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाले आहेत. तर काही ठिकाणी नव्या इच्छुकांना संधी मिळणार असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्यांचे गट आरक्षित झाले आहेत त्यांना आत नवा गट शोधावा लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मोर्चे बांधणी करावी लागेल. अशा वेळी एकाच गटात अनेक जण इच्छुक असणार आहेत. त्यातून आता राजकीय पक्षांना मार्ग काढावा लागणार आहे.