Anaya Bangar News: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने लिंगबदल शस्त्रक्रिया (Gender Change Surgery) करून आता 'अनाया' म्हणून आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच अनाया बांगरने बँकॉकमध्ये लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली. मात्र ही शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतराची प्रक्रिया वाटते तितकी सोपी नसल्याचे सांगत अनायाने असह्य वेदना सहना करत असल्याचे सांगितले आहे. बँकॉक येथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर सध्या अनाया एका कठीण रिकव्हरी फेजमधून जात आहे.
'या' अभिनेत्रीने 16 वर्षानंतर सोडला भारत, देश सोडताच म्हणाली आता इथे घरा सारखं वाटत नाही
अनाया बांगर सहन करतेय असह्य वेदना
बँकॉक येथे झालेल्या शस्त्रक्रियेनंतर, अनाया सध्या प्रचंड वेदना, औषधे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या उपचार प्रक्रियेचा सामना करत आहे. अनायाने इन्स्टाग्रामवर तिच्या सध्याच्या प्रकृतीबाबत भाष्य करताना म्हटले की, हीलिंग ही एक संथ प्रक्रिया आहे. काही दिवस खूप सकारात्मक वाटतं, तर काही दिवस फक्त वेदना आणि औषधे घेण्यात जातात.
तिने शेअर केलेल्या औषधांच्या फोटोंवरून या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तिला किती मोठ्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याची प्रचिती येते. "कधी कधी खूप चिडचिड होते, तर कधी प्रचंड थकवा जाणवतो," असे सांगत तिने आपला मानसिक संघर्षही मांडला आहे. तिने सांगितले की कधीकधी संपूर्ण दिवस फक्त स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यात आणि स्वतःला शांत ठेवण्यात जातो. या काळात ती मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याचा प्रयत्न करत आहे. अनायाने या पोस्टमध्ये आपले दुःख पूर्ण प्रामाणिकपणे मांडले आहे. अनायाची ही पोस्ट पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.
छोट्या छोट्या गोष्टीत शोधतेय आनंद
या कठीण काळात अनाया छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत आहे. आंबे खाणे किंवा गेम्स खेळणे यातून ती स्वतःला गुंतवून ठेवत आहे. सोशल मीडियावर तिच्या या धाडसी निर्णयाचे आणि संघर्षाचे कौतुक होत असून, अनेकांनी तिला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका बाजूला शारीरिक वेदना असल्या तरी, स्वतःच्या अस्मितेसाठी दिलेला हा लढा प्रेरणादायी ठरत असल्याची चर्चा नेटिझन्समध्ये आहे.