जाहिरात

'या' अभिनेत्रीने 16 वर्षानंतर सोडला भारत, देश सोडताच म्हणाली आता इथे घरा सारखं वाटत नाही

आता तिने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. ती कोणत्या देशात जाणार हे अजून समोर आले नाही.

'या' अभिनेत्रीने 16 वर्षानंतर सोडला भारत, देश सोडताच म्हणाली आता इथे घरा सारखं वाटत नाही
  • इराणी अभिनेत्री मंदाना करीमीने भारतात १६ वर्षे राहून अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती
  • मानवी हक्कांसाठी आवाज उठवल्यामुळे तिला धमक्या येत होत्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडण्याचा निर्णय घेतला
  • मंदाना करीमीला या कठीण काळात मित्र, सरकार आणि माध्यमांकडून कोणतीही मदत किंवा समर्थन मिळाले नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

जवळपास 16 वर्ष भारतात राहीली. नाव कमवलं. अभिनेत्री म्हणून करिअर घडवलं. पण आता 16 वर्षानंतर तिने देश सोडला. देश सोडल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रसिद्ध इराणी अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी असं तिचं नाव आहे.  सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन दरम्यान तिने एअरपोर्टवरील एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. हा निर्णय आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण निर्णय असल्याचे तिने म्हटले आहे. तिने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

धमक्यांमुळे घेतला निर्णय
मंदाना करीमीने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, ती सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडून जात आहे. इराणमधील मानवाधिकार मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवल्यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. इराणमधील अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलल्यामुळे आपल्याला सतत धमक्या मिळत होत्या, असेही तिने नमूद केले. तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या का, असे विचारले असता तिने "हो, नेहमीच" असे उत्तर दिले. आता ती भारत ही सोडत आहे. 

नक्की वाचा - Shocking news: पहिला सिनेमा सुपरहिट, पण नशिबाचे फेरे! 'या' अभिनेत्यावर आता आलीय रिक्षा चालवण्याची वेळ

कोणाचीही साथ मिळाली नाही
मंदानाने खंत व्यक्त केली की, या कठीण काळात तिला कोणाचेही समर्थन मिळाले नाही. मित्र, सरकार किंवा मीडिया यांपैकी कोणीही तिच्या पाठीशी उभे राहिले नाही. "भारत माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखा होता, पण आता इथे घर असल्यासारखे वाटत नाही," असे भावूक उद्गार तिने काढले. आपल्या लोकांसाठी आणि हक्कांसाठी लढत असताना मिळालेली ही वागणूक तिला क्लेशदायक वाटली.

नक्की वाचा - Deepika Padukone Photos: दीपिका पादुकोणची दुसरी प्रेग्नेंसी ते चिमुकली दुआ, मातृत्वाच्या प्रवासातील 8 खास फोटो

करिअर आणि पुढील प्रवास
मंदाना करीमी शेवटची 'थार' या चित्रपटात अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांच्यासोबत दिसली होती. याशिवाय ती 'बिग बॉस' आणि 'लॉकअप' सारख्या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरांत पोहोचली होती. आता ती एका नवीन देशात आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. तिने भारत सोडण्याचा निर्णय या आधीच घेतला होता. आता तिने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. ती कोणत्या देशात जाणार हे अजून समोर आले नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com