जाहिरात

Team India Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा स्पॉन्सर! BCCIची लॉटरी, प्रत्येक मॅचसाठी मिळणार 'इतके' कोटी?

Indian Cricket Team New Sponsor Deal News: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीच्या प्रायोजकाचा शोध अखेर संपला आहे. टीम इंडियाला आता नवीन स्पॉन्सर मिळाल्याची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Team India Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा स्पॉन्सर! BCCIची लॉटरी, प्रत्येक मॅचसाठी मिळणार 'इतके' कोटी?

Indian Cricket Team New Jersey Sponsor 2025: भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीच्या प्रायोजकाचा शोध अखेर संपला आहे. टीम इंडियाला आता नवीन स्पॉन्सर मिळाल्याची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अपोलो टायर्सला टीम इंडियाचा अधिकृत जर्सी प्रायोजक घोषित करण्यात आले आहे. बीसीसीआयने ड्रीम११ (Dream 11)  सोबतचा करार रद्द केल्यानंतर आता अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर म्हणून झळकणार आहे. आता प्रत्येक सामन्यासाठी अपोलो टायर्स बीसीसीआयला किती पैसे देईल आणि काय असतात याबाबचचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या जर्सी प्रायोजकत्व लिलावात, अपोलो टायर्स (Apollo Tyres) कंपनीने प्रति सामना ४.५ कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, जी ड्रीम११ द्वारे पूर्वी देण्यात येणाऱ्या ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा नवीन करार २०२७ पर्यंत लागू असेल आणि यासह, अपोलो टायर्सचा लोगो आता टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीवर दिसेल. माध्यमांमधील रिपोर्टनुसार हा करार केवळ भारतीय क्रिकेट संघाला मजबूत आर्थिक आधार देणार नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपोलो टायर्सच्या ब्रँड व्हॅल्यूला नवीन उंचीवर नेईल.

IND vs PAK : पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! नो-हँडशेकवरून धमकी, पण जय शाह यांच्या भीतीने घेतला 'यू टर्न'

प्रायोजक कंपनीच्या खात्यात किती पैसे असणे आवश्यक आहे?

प्रायोजकत्वासाठी, बीसीसीआयने (BCCI) कंपन्यांसाठी कठोर आर्थिक मानके निश्चित केली होती. गेल्या तीन वर्षांत बोली लावणाऱ्या कंपनीची सरासरी उलाढाल किमान ३०० कोटी रुपये असावी किंवा तिची निव्वळ संपत्ती ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी. अपोलो टायर्सने हे निकष खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केले आहेत. बीसीसीआयने वेगवेगळ्या फॉरमॅट आणि वेगवेगळ्या स्पर्धांसाठी दर निश्चित केले आहेत.

द्विपक्षीय मालिकांसाठी, प्रति सामना ३.५ कोटी रुपये द्यावे लागतील. आयसीसी आणि आशिया कप सारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, प्रति सामना १.५ कोटी रुपये द्यावे लागतील. एकूणच, बीसीसीआय पुढील तीन वर्षांत जर्सी प्रायोजकत्वातून ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. दरम्यान, हा करार भारतीय क्रिकेट आणि कॉर्पोरेट जगतासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण या भागीदारीमुळे केवळ बीसीसीआयचे उत्पन्न वाढणार नाही तर जागतिक क्रीडा बाजारपेठेत अपोलो टायर्सलाही फायदा होईल.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर BCCI अध्यक्ष होणार? मास्टर ब्लास्टरच्या टीमनेच दिले स्पष्टीकरण

Listen to the latest songs, only on JioSaavn.com