Asia Cup 2025: भारत VS पाकिस्तान! कुणाचे सलामवीर करणार कमाल; पाहा थक्क करणारी आकडेवारी

कोणत्याही संघाचे सलामीवीर फलंदाज खूप महत्वाचे असतात. कारण ते फलंदाजीला सुरुवात करतात. जर त्यांची कामगिरी चांगली असेल तर त्यांच्या मागे येणाऱ्या फलंदाजांवर जास्त दबाव नसतो.

जाहिरात
Read Time: 3 mins

Asia  Cup 2025 India Vs Pakistan: आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पण सर्वांच्या नजरा 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर आहेत. आगामी स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्याही संघाचे सलामीवीर फलंदाज खूप महत्वाचे असतात. कारण ते फलंदाजीला सुरुवात करतात. जर त्यांची कामगिरी चांगली असेल तर त्यांच्या मागे येणाऱ्या फलंदाजांवर जास्त दबाव नसतो. ज्यामुळे ते मोकळेपणाने फलंदाजी देखील करतात. भारत आणि पाकिस्तानच्या संघामध्ये सलामवीरांची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या... 

भारतीय संघाच्या सलामवीरांची कामगिरी!

आशिया कपसाठी भारतीय संघात एकूण तीन सलामीवीरांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची नावे आहेत. संजू सॅमसनने ४२, शुभमन गिलने २१ आणि अभिषेक शर्माने १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, सॅमसनने ३८ डावांमध्ये २५.३२ च्या सरासरीने ८६१ धावा केल्या आहेत, गिलने २१ डावांमध्ये ३०.४२ च्या सरासरीने ५७८ धावा केल्या आहेत आणि अभिषेक शर्माने १६ डावांमध्ये ३३.४४ च्या सरासरीने ५३५ धावा केल्या आहेत.

Sanju Samson : संजू सॅमसनसोबत धोका, टीममध्ये निवड पण Playing 11 मध्ये जागा नाही ! कारणही उघड

तिन्ही भारतीय सलामीवीरांची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

संजू सॅमसन - ४२ सामने - ३८ डाव - ८६१ धावा - २५.३२ सरासरी - १५२.३९ स्ट्राईक रेट - तीन शतके - दोन अर्धशतके

शुभमन गिल - २१ सामने - २१ डाव ​​- ५७८ धावा - ३०.४२ सरासरी - १३९.२८ स्ट्राईक रेट - एक शतक - तीन अर्धशतके

Advertisement

अभिषेक शर्मा - १७ सामने - १६ डाव - ५३५ धावा - ३३.४४ सरासरी - १९३.८५ स्ट्राईक रेट - दोन शतके - दोन अर्धशतके

पाकिस्तानच्या सलामविरांची कामगिरी!

आगामी स्पर्धेसाठी पाकिस्तानकडून एकूण चार सलामीवीरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी साहिबजादा फरहान आणि सॅम अयुब हे व्यावसायिक सलामीवीर आहेत. त्यांच्याशिवाय, फखर जमान आणि मोहम्मद हरिस हे सलामीवीर तसेच मधल्या फळीत फलंदाजी करण्यातही पारंगत आहेत.

Advertisement

 पाकिस्तानी सलामीवीरांची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

साहिबजादा फरहान - १५ सामने - १५ डाव - ३१५ धावा - २१.०० सरासरी - १२७.०२ स्ट्राइक रेट - तीन अर्धशतके

सॅम अयुब - ३६ सामने - ३४ - डाव - ७०५ धावा - २२.०३ सरासरी - १३७.१६ स्ट्राइक रेट - तीन अर्धशतके

Advertisement

फखर जमान - ९७ सामने - ८९ डाव - १९४९ धावा - २२.६६ सरासरी - १३१.७८ स्ट्राइक रेट - ११ अर्धशतके

मोहम्मद हरिस - २३ सामने - २३ डाव - ३९१ धावा - १८.६२ सरासरी - १४४.८२ स्ट्राइक रेट - एक शतक

( नक्की वाचा : Shreyas Iyer :'त्याची काही चूक नाही,आमचीही नाही' श्रेयस अय्यरचा समावेश न होण्याचं अजित आगरकरनं सांगितलं कारण )


भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.

राखीव: प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि ध्रुव जुरेल.

पाकिस्तान: सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुईम आफ्रिदी.