IPL 2026, CSK vs DC : सलग तीन पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जने विजयाचं खात उघडलं, दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 18 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये रंगला.

जाहिरात
Read Time: 2 mins
CSK vs DC, IPL 2026 Match

CSK vs DC Match Updates : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 18 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये रंगला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. संजू सॅमसनने वादळी खेळी करत 56 चेंडूत 155 धावांचं दमदार शतक ठोकलं.तर आयुष म्हात्रेनं 36 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावांच्या जोरावर चेन्नईने 20 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 212 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर 213 धावांचं टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरलेला दिल्लीचा संघ 189 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे चेन्नईने या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवला. 

संजू सॅमसननं ठोकलं वादळी शतक

चेन्नईसाठी संजू सॅमसनने 115 धावांची नाबाद शतकी खेळी केली. यामध्ये 4 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड 18 धावा करून स्वस्तात माघारी परतला.तर आयुष म्हात्रेनं 36 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 59 धावा केल्या. तर शिवम दुबे 20 धावांवर नाबाद राहिला.दिल्लीसाठी अक्षर पटेलने एक विकेट घेतली. 

Advertisement

दिल्लीसाठी सलामीवीर फलंदाज पाथूम निसंकाने 24 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकार ठोकून 41 धावांची खेळी साकारली. के एल राहुल 18 धावांवर झेलबाद झाला. समीर रिझवीलाही धावांचा सूर गवसला नाही. त्याने 9 चेंडूत फक्त 6 धावा केल्या. अक्षर पटेल फक्त एक धाव करून तंबूत परतला. डेव्हिड मिलरने 17 धावा केल्या. आशुतोष शर्माही 19 धावांवर बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने 38 चेंडूत 60 धावांची खेळी साकारली. चेन्नईसाठी खलिल अहमद,अंशुल कंबोज, सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर जेमि ओव्हरटनने 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.