Cricket News: 6,6,6,6,6,6...नवा'सिक्सर किंग'! फक्त 11 बॉलमध्ये 50 धावा, सलग 8 षटकार ठोकत रचला इतिहास

यापूर्वी वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स आणि भारताचे रवी शास्त्री यांनी हा पराक्रम केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरतच्या क्रिकेट मैदानावर शनिवारी मेघालयच्या आकाश चौधरी या फलंदाजाने एका नव्या विक्रमाची नोंद केली. आकाशने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केवळ 11 चेंडूंमध्ये अर्धशतक (Fifty) झळकावून इतिहास रचला आहे. या कामगिरीमुळे त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक (Fastest Fifty) करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी, 2012 मध्ये वेन व्हाईट यांनी 12 चेंडूंमध्ये, तर 1965 मध्ये क्लाईव्ह इनमॅन यांनी 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. आकाश चौधरीने हे दोन्ही विक्रम मोडीत काढले आहेत.

नक्की वाचा - टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट, देणार 'ही' महागडी कार गिफ्ट

सलग 8 षटकारांचे 'अविश्वसनीय' पराक्रम
आकाश चौधरीच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने सलग 8 षटकार (Consecutive Sixes) लगावले. यामध्ये एकाच षटकात सलग 6 षटकार मारण्याचाही पराक्रम त्याने केला. रणजी ट्रॉफी सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध मेघालयच्या डावातील 126 व्या षटकात गोलंदाज लिमर डाबी याच्याविरुद्ध त्याने हे सलग 6 षटकार लगावत खळबळ माजवली. त्याचे आक्रमक रूप पाहून विरोधी टीम हादरून गेली होती. 

नक्की वाचा - Jemimah Rodrigues: मासिक पाळीच्या वेळी काय करता? जेमिमा रॉड्रिग्जनं दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही म्हणाल, अरे बापरे

एका षटकात 6 षटकार मारणारा दुसरा भारतीय
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार (Six Sixes in an Over) मारणारा आकाश चौधरी हा जगातील तिसरा आणि भारतातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स आणि भारताचे रवी शास्त्री यांनी हा पराक्रम केला होता. आकाश 14 चेंडूंमध्ये 50 धावा करून नाबाद राहिला. त्याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मेघालय संघाने आपला पहिला डाव 6 विकेट्सवर 628 धावांवर घोषित केला. यापूर्वी, भारताकडून बंदीप सिंह यांनी 2015-16 मध्ये 15 चेंडूंमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले होते.