WPL 2026 Auction Latest News : महिला प्रीमियर लीग जगातील सर्वात मोठ्या टी-20 टूर्नामेंटपैकी एक बनली आहे. या लीगच्या प्रत्येक हंगामात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या महिलांचा समावेश असतो. मॅच-विनर आणि फॉर्मात असलेला खेळाडू आपल्या संघात खरेदी करण्यासाठी या लीगच्या लिलावात अनेक फ्रँचायझींमध्ये रस्सीखेंच सुरु असते. यावेळीही असंच काहीस घडलं आहे.
WPL2026 च्या लिलावात दीप्ती शर्मा सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिची क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली आहे. दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने तब्बल 3.20 कोटी रुपयांत खरेदी करून संघात सामील केलं आहे.दीप्ती शर्मा महिला प्रीमियर लीगमधील दुसरी सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली आहे.म्हणजेच दीप्ती आता स्मृती मंधानानंतर दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे,जिच्यावर लिलावात 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांवर बोली लावण्यात आली.
WPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
स्मृती मंधाना – 3.40 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)
स्मृती मंधाना WPL च्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे. तिला 2023 मध्ये 3.40 कोटी रुपयांमध्ये साइन करण्यात आले. तिने RCB ला 2024 चे विजेतेपद मिळवून दिले आणि ती 2026 साठीही रिटेनर खेळाडू राहणार आहे.
एश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) – 3.20 कोटी – गुजरात जायंट्सने केलं खरेदी (2023)
दीप्ती शर्मा (भारत) – 3.20 कोटी – यूपी वॉरियर्स (2025)
यूपी वॉरियर्सने RTM अंतर्गत दीप्ती शर्माला 3.20 कोटींमध्ये खरेदी करून संघात सामील केले. दीप्ती शर्मा WPL इतिहासातील दुसरी सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली आहे.
नेट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड) – 3.20 कोटी – मुंबई इंडियन्स (WPL 2023)
नक्की वाचा >> यालाच म्हणतात खरी मैत्री! स्मृती मंधानाच्या दु:खद काळात जेमिमा रॉड्रिग्जने घेतला सर्वात मोठा निर्णय
WPL ऑक्शनमधील सर्वात महागडे भारतीय खेळाडू
3.40 कोटी – स्मृती मंधाना – RCB, 2023
3.20 कोटी – दीप्ती शर्मा – UPW, 2025
2.60 कोटी – दीप्ती शर्मा – UPW, 2023
2.20 कोटी – जेमिमा रॉड्रिग्स – DC, 2023
2.00 कोटी – शैफाली वर्मा – DC, 2023
2.00 कोटी – काश्वी गौतम – GG, 2024
नक्की वाचा >> लग्न मोडलं की पुढे ढकललं? चर्चांनंतर स्मृती मंधाना-पलाशने इन्स्टाग्रामवर केला 'SAME' बदल, तुम्ही पाहिला का?
WPL ऑक्शन 2026 मधील सर्वात महागड्या खेळाडू
3.20 कोटी – दीप्ती शर्मा – यूपी वॉरियर्स, 2025
3.00 कोटी – अमेलिया केर – मुंबई इंडियन्स, 2025
2.00 कोटी – सोफी डिवाइन – गुजरात जायंट्स, 2025
1.90 कोटी – मेग लॅनिंग – यूपी वॉरियर्स, 2025
1.10 कोटी – लॉरा वुलफार्ट – दिल्ली कॅपिटल्स, 2025