जाहिरात

लग्न मोडलं की पुढे ढकललं? चर्चांनंतर स्मृती मंधाना-पलाशने इन्स्टाग्रामवर केला 'SAME' बदल, तुम्ही पाहिला का?

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर असा बदल केला आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लग्न मोडलं की पुढे ढकललं? चर्चांनंतर स्मृती मंधाना-पलाशने इन्स्टाग्रामवर केला 'SAME' बदल, तुम्ही पाहिला का?
Smriti Mandhana And Palash Muchhal
मुंबई:

Smriti Mandhana And Palash Muchaal Instagram : भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. परंतु, स्मृतीचे वडील श्रीनिवास यांची लग्नाच्या दिवशी अचानक तब्येत बिघडल्याने या लग्नाला वेगळं वळण लागलं. या दोघांचं लग्न पुढे ढकलल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर लगेचच स्मृतीने इ्न्स्टाग्रामवर शेअर केलेले लग्नाचे-हळदीचे फोटो डिलिट केले. त्यानंतर स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. इतकच नव्हे तर, पलाशने मेंरी डिकॉस्टा नावाच्या मुलीसोबतचे चॅट केल्याचे स्क्रिनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे स्मृती-पलाशचं लग्न मोडलं की काय? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. 

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर काय बदल केला?

लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खराब झाल्याची घटना घडली. स्मृती-पलाशच्या लग्नाला कोणाची तरी वाईट नजर लागली की काय?असाही ट्रेंड इंटरनेटवर सुरू झाला होता. दरम्यान, स्मृती मंधाना आणि पलाशने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक ब्लू इमोजी ठेवला. या इमोजीचा अधिकृत अर्थ काय आहे, याबाबत जरी साशंकता असली, तरी हा निळा इमोजी नजर लागू नये यासाठी ठेवला जातो, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Latest and Breaking News on NDTV

स्मृतीच्या हळदी समारंभात भारताच्या महिला खेळाडूंनी धरला ठेका

स्मृती मंधाने इन्स्टाग्रामवर तिच्या हळदी समारंभासह मेहंदीचे सुंदर फोटो शेअर केले होते. स्मृतीच्या हळदी समारंभात तिच्या सहकारी आणि भारतीय महिला संघाच्या सर्व खेळाडू उपस्थित होत्या. यावेळी या सर्व महिला खेळाडूंनी स्मृतीसोबत जबरदस्त ठुमके लगावले होते. डीजेच्या तालावर स्मृती-पलाशसह त्यांचे कुटुंबीय थिरकले होते. 23 नोव्हेंबरला थाटामाटात लग्नसोहळा पार पडणार होता, परंतु स्मृतीच्या वडिलांची अचानाक तब्येत बिघडल्याने या लग्नासोहळ्यात एकप्रकारे विघ्नच आलं. स्मृतीचे वडील श्रीनिवासन यांना हॉर्ट अटॅक आल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com