Sachin Tendulkar: सचिनने लेकाच्या लग्नात बालमित्र विनोद कांबळीला आमंत्रित केलं होतं की नाही? सत्य आलं समोर

या शिवाय आजी माजी अनेक क्रिकेट पटू या लग्न सोहळ्यास उपस्थित होते. त्यांनी नव वधू वरांना यावेळी आशिर्वाद दिले.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अर्जुन तेंडुलकरचा विवाह ५ मार्च २०२६ रोजी मुंबईत सानिया चांडोक सोबत अत्यंत शाही पद्धतीने पार पडला
  • लग्न सोहळ्यात क्रिकेट, मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज, नेते, मंत्री आणि बॉलिवूड कलाकार उपस्थित होते
  • सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी या लग्नाला हजर नव्हता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Sachin Tendulkar invite Vinod Kambli: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह 5 मार्च 2026 रोजी मुंबईत अत्यंत शाही थाटात पार पडला. अर्जुनने प्रसिद्ध उद्योजक सानिया चांडोक हिच्याशी लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज उपस्थित होते. आजी माजी क्रिकेटपटूंसह नेते, मंत्री, बॉलिवूड कलाकार यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. पण या लग्नात एका व्यक्तीची अनुपस्थितीत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या आनंदाच्या प्रसंगी सचिनचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी कुठेही दिसला नाही, त्यामुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे सचिनने विनोद कांबळीला निमंत्रण दिलं होतं की नाही याची ही चर्चा होत आहे. 

हा विवाह सोहळा अशा वेळी पार पडला जेव्हा भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होत आहे. विशेष म्हणजे, ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ मुक्काला होता, त्याच ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संपूर्ण भारतीय संघाला या सोहळ्यात सहभागी होणे सोपे झाले. माजी कर्णधार एम.एस. धोनी पत्नी साक्षीसह या लग्नाला उपस्थित होता. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या शिवाय आजी माजी अनेक क्रिकेट पटू या लग्न सोहळ्यास उपस्थित होते. त्यांनी नव वधू वरांना यावेळी आशिर्वाद दिले. 

Advertisement

नक्की वाचा - Arjun Tendulkar wedding: मास्टर ब्लास्टरच्या घरी येणार सून, पण त्याचे होणारे व्याही काय करतात? वाचा सविस्तर

सध्या अर्जून तेंडुलकरच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात खेळाडू, नेते, बॉलिवूडचे कलाकार सर्रास पणे दिसत आहेत. मात्र त्यात सचिनचा जिवलग मित्र विनोद कांबळी कुठेही दिसून आला नाही. सचिनने त्याला आमंत्रित केले होते की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही वर्षा पूर्वी हे दोघे शिवाजी पार्क इथल्या एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी आजारी असलेल्या आपल्या मित्राची सचिनने जवळ जावून चौकशी केली होती. त्यावेळी त्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये सार्वजनिकरीत्या फारसा संवाद दिसलेला नाही. 

नक्की वाचा - 'भारताने माझा विश्वासघात केला' 37 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा देश सोडण्याचा निर्णय, थेट इराणला जाणार

आता अर्जूनच्या लग्नातही कांबळी दिसला नाही. त्यामुळे कांबळीच्या अनुपस्थितीने त्यांच्या मैत्रीत दुरावा आल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. विनोद कांबळी सध्या आपल्या आजारासोबत लढत आहे. त्याला चालताना ही त्रास होत आहे. शिवाय बोलताना ही तो अडखळतो. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मध्यंतरी त्याची आर्थिक स्थिती ही खालावली होती. त्यावेळी अनेक क्रिकेटपटू त्याच्या मदतीसाठी पुढे आले होते. सुनिल गावस्कर यांनी ही विनोदसाठी मदतीचा हात पुढे केला होता. तर त्याच्या उपचारांची जबाबदारी ही एका संस्थेने घेतली आहे.