जाहिरात

Arjun Tendulkar wedding: मास्टर ब्लास्टरच्या घरी येणार सून, पण त्याचे होणारे व्याही काय करतात? वाचा सविस्तर

Arjun Tendulkar wedding:  तेंडुलकर कुटुंबाचे होणारे व्याही नेमके काय करतात, याची मोठी उत्सुकता सध्या क्रिकेट फॅन्समध्ये आहे.

Arjun Tendulkar wedding: मास्टर ब्लास्टरच्या घरी येणार सून, पण त्याचे होणारे व्याही काय करतात? वाचा सविस्तर
Arjun Tendulkar wedding: मुंबईतील एका आलिशान सोहळ्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
मुंबई:

Arjun Tendulkar wedding:  क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आता आयुष्याची नवी इनिंग सुरू करायला सज्ज झाला असून तो 5 मार्च 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी सध्या सनईचौघड्यांचे सूर घुमणार आहेत. अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक नक्की कोण आहे आणि तेंडुलकर कुटुंबाचे होणारे व्याही नेमके काय करतात, याची मोठी उत्सुकता सध्या क्रिकेट फॅन्समध्ये आहे. मुंबईतील एका आलिशान सोहळ्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अर्जुनची होणारी नवरी सानिया चंडोक कोण आहे?

अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चंडोक ही एक यशस्वी उद्योजिका आणि पशुवैद्यकीय तंत्रज्ञ आहे. तिने आपले उच्च शिक्षण लंडनमधील प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पूर्ण केले असून तिथून तिने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. प्राण्यांवर असलेल्या प्रेमापोटी तिने 2024 मध्ये वेटरिनरी टेक्निशियनचा कोर्सही पूर्ण केला. 

सध्या ती मुंबईत मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी नावाने एक लक्झरी पेट स्पा चालवते. या व्यवसायाच्या माध्यमातून ती पाळीव प्राण्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि ग्रूमिंग सेवा देते.

( नक्की वाचा : Sanju Samson : सेमी फायनलपूर्वी टीम इंडिया अडचणीत! संजू सॅमसनवर येणार बंदी? ICC च्या निर्णयावर देशाचं लक्ष )
 

तेंडुलकर कुटुंबाचे व्याही कोण आहेत?

सानिया चंडोक ही मुंबईतील नामवंत व्यापारी रवी घई यांची नात आहे. तिचे वडील सनी चंडोक हे ग्रेविस ग्रुप या मोठ्या व्यावसायिक समूहाशी जोडलेले आहेत. घई आणि चंडोक कुटुंब हॉटेल, फूड व्हेंचर्स आणि आईस्क्रीम अशा विविध क्षेत्रातील मोठ्या व्यवसायांसाठी ओळखले जाते. 

सानियाची आई गौरिका घई चंडोक या देखील प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. माध्यमांमधील वृत्तानुसार, सानियाची वैयक्तिक संपत्ती 90 लाख रुपये ते 5 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तिच्या कुटुंबाच्या ग्रेविस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडने बिझनेसच्या जगात मोठे नाव कमावले आहे.

शाही विवाहसोहळा आणि दिग्गज पाहुण्यांची उपस्थिती

अर्जुन आणि सानिया यांचा विवाह सोहळा मुंबईतील प्रसिद्ध सेंट रेजिस हॉटेलमध्ये पार पडणार आहे. विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये सध्या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू देखील थांबलेले आहेत. 

या सोहळ्यासाठी सचिन तेंडुलकरने देशातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण दिले आहे. यामध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अंजली तेंडुलकर यांचे माहेर आणि कुटुंब

अर्जुनच्या लग्नाच्या निमित्ताने सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर यांच्या कुटुंबाचीही चर्चा होत आहे. अंजली यांचे वडील आनंद मेहता हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, तर आई अन्नाबेन मेहता या ब्रिटिश वंशाच्या आहेत. अंजली स्वतः एक सुशिक्षित आणि सुवर्णपदक विजेती बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांनी मुंबईतील ग्रांट मेडिकल कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. 1995 मध्ये सचिन आणि अंजली यांचा विवाह झाला असून त्यांना सारा आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. आता अर्जुनच्या लग्नामुळे तेंडुलकर आणि चंडोक हे दोन मोठे आणि प्रतिष्ठित परिवार एकत्र येणार आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com