IPL 2026: तिलक वर्माचे झंझावाती शतक, मुंबईच्या पराभवाची मालिका खंडीत, गुजरातचा पराभव

गुजरातकडून रबाडाने तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईला 199 धावांवर गुजरातला रोखता आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
सौजन्य IPL

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्या आधी मुंबई इंडियन्सकडून खेळताना तिलक वर्माला चांगलाच सुरू गवसला. त्यांनी या हंगामातील आपले पहिले शतक ठोकले. त्यामुळे मुंबईला 199 धावांचा टप्पा गाठता आला. या सामन्यात पुन्हा एकदा सुर्य कुमार यादव अपयशी ठरला. त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  गुजरातकडून रबाडाने तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईला 199 धावांवर गुजरातला रोखता आले. 

साई सुदर्शन आणि जोस बटलर स्वस्त्यात बाद झाल्यानंतर कॅप्टन शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पण शुभमन गीलने निराशा केली. तो 13 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला. त्यामुळे सहा ओव्हर्समध्ये 45 धावांत 3 बाद अशी स्थिती गुजरातची झाली होती. त्या पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदर ही बाद झाला. त्याने 17 चेंडूत 26 धावा केल्या.  ग्लेन फिलिप्स ही आल्या सारखा लगेच माघारी परतला. राहुल तेवतिया ही फार काही करू शकला नाही. त्यानंतर गुजरातची पडझड सुरूच राहीली. शेवट गुजरातचा संपूर्ण संघ 100 धावांत बाद झाला. मुंबईचा 99 धावांनी विजय झाला. मुंबईकडून अश्विनी कुमारने चार विकेट घेतल्या. 

Advertisement

नक्की वाचा - Ayush Mhatre: सीएसकेला मोठा 'धक्का'! इन-फॉर्म फलंदाज आयुष म्हात्रे IPLमधून बाहेर

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अडखळत झाली होती. सलामीवीर दानिश मालेवार अवघ्या 2 धावा काढून बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक (13) आणि सूर्यकुमार यादव (15) देखील स्वस्तात परतले. मुंबईने 44 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. अशा कठीण प्रसंगी तिलक वर्माने मैदानाचा ताबा घेतला. त्याने नमन धीर (45) सोबत 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यासोबत 81 धावांची तुफानी भागीदारी करत मुंबईला 5 बाद 199 धावांपर्यंत पोहोचवले. टिळक वर्माने आपले शानदार शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले.

  T20 Captaincy: सूर्याचे कर्णधारपद धोक्यात? 'हे' 5 खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत, BCCI मोठा निर्णय घेणार

तिलक वर्माने 45 चेंडूत 101  धावा केल्या. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. तो शेवट पर्यंत खेळपट्टीवर होता. तो नाबाद राहीला. तर दुसऱ्याबाजूला नमन धिरने ही त्याला चांगली साथ दिली. त्याने 32 चेंडूत 45 धावा केल्या. मुंबईच्या अन्य फलंदाजांना अपेक्षे प्रमाणे कामगिरी करता आली नाही. दरम्यान 200 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. जसप्रीत बुमराहने साई सुदर्शनला शून्यावर बाद केले. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने जोस बटलरला बाद करून गुजरातच्या अडचणीत वाढ केली.