GT vs SRH, IPL 2026 : आयपीएलचा 56 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकू प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाने 20 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 168 धावांपर्यंत मजल मारली.हैदराबाद संघापुढे विजयासाठी 169 धावांचं आव्हान होतं. परंतु, गुजरातच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे हैरदाबादचा संघ 14.5 षटकांमध्ये 86 धावांवर गारद झाला. त्यामुळे या सामन्यात गुजरातचा 82 धावांनी विजय झाला.
वॉश्गिंटनची 'सुंदर' खेळी, 33 चेंडूत 50 धावा
गुजरात संघासाठी सलामीवीर साई सुदर्शनने 44 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली.कर्णधार शुबमन गिलला या सामन्यात धावांचा सूर गवसला नाही. गिल 5 धावा करून तंबूत परतला. जॉस बटलरही स्वस्तात माघारी गेला. बटलरने फक्त 7 धावा केल्या. त्यानंतर निशांत संधू 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण वॉश्गिंटन सुंदरने अप्रतिम फलंदाजी करून 33 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.हैदराबाद संघासाठी सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेड शून्य धावांवर बाद झाला. अभिषेक शर्मालाही मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. शर्मा 6 धावांवर बाद झाला.त्यापाठोपाठ इशान किशन 9 धावांवर माघारी परतला.
नक्की वाचा >> Sangli News: सांगली हादरलं! मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले अन् घडलं भयंकर, 6 भाविक ठार, 10 जखमी
हैदराबाद संघासाठी सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेड शून्य धावांवर बाद झाला. अभिषेक शर्मालाही मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. शर्मा 6 धावांवर बाद झाला.त्यापाठोपाठ इशान किशन 9 धावांवर माघारी परतला. त्यानंतर स्मरण रवीचंद्रन 9,हेन्रिक क्लासेन 14,सलील अरोर 16,नितिश कुमार रेड्डी 2 धावांवर बाद झाला. गुजरातसाठी मोहम्मद सिराजने 1,कगिसो रबाडाने 3,जेसन होल्डरने 3,तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली.तर सनरायजर्ससाठी कर्णधार पॅट कमिन्सने 1,प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.