जाहिरात

Sangli News: सांगली हादरलं! मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले अन् घडलं भयंकर, 6 भाविक ठार, 10 जखमी

सांगलीतून सर्वात भयंकर घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला.तर 10 जण जखमी झाले.

Sangli News: सांगली हादरलं! मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले अन् घडलं भयंकर, 6 भाविक ठार, 10 जखमी
Sangli Wall Collapsed Incident

शरद सातपुते, प्रतिनिधी 

Sangli Wall Collapsed Incident : सांगलीतून सर्वात भयंकर घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला.तर 10 जण जखमी झाले. वादळी वाऱ्यामुळे चिराविटाची भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली. मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. वादळी वारा सुटल्याने भाविकांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आसरा घेतला होता. मात्र,पत्र्याचं शेड उडालं आणि ते चिरा-वीटांच्या बांधकामावर आदळल्याने विटा खाली पडल्या. या दुर्देवी घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोठेवाडी येथील मरगुबाई देवीची यात्रा मंगळवार व शुक्रवार या दिवशी मोठ्या प्रमाणात भरते. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही हजारो भाविक उपस्थित राहत असतात. मंगळवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक यात्रेकरू भिंतीलगत उभे राहिले होते. मात्र काही क्षणांतच वाऱ्याचा वेग वाढल्याने पुढील बाजूस उभारलेले पत्र्याचे शेड उडाले व त्याचा धक्का बसून भिंत कोसळली. 

नक्की वाचा >> Heat Alert: पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, तुमचा जिल्हा यात आहे का?

या दुर्घटनेत मृत्यू झालेली नावे खालीलप्रमाणे

पाडोंझरी येथील मंगल भाऊसाहेब मोठे (वय ४५ पाडोंझरी), अरुण विजय गेजगे (वय 14  डोमनाळ )सोनू लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ,) ता. जि. विजयपूर, कर्नाटक), कोंडीबा साऊबा गेजगे (वय 65 रा. दरीबडची),संजुबाई राम चौधरी (वय 51कर्नाटक टक्कळकी ), शंकर आबा लोखंडे (वय 75, रा. दरीबडची) यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत 451 धोकादायक इमारती, अतिधोकादायक किती? रहिवाशांना थक्क करणारी आकडेवारी समोर

दर्याप्पा नागा कोकरे, मुर्शिद पुजारी, मरीबा नागा कोकरे,संजू आप्पासो एवळे,शिवा गेजगे, कोंडीबा बिरा गेजगे, बिरू विजू गेजगे,यांच्यासह १५ ते १७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com