ICC WTC Final 2025 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी क्रिकेटविश्व सज्ज झाले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. 11 जूनपासून लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. गेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. ही लढत ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकली होती. हा खिताब आपल्याकडेच राहावा यासाठी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे ही मानाची ट्रॉफी आपल्याकडे यावी यासाठी टेंबा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाला झुंज देईल.
ICC WTC Final 2025 Timetable And Venue: कुठे आणि कधी आहे सामना ?
तारीख: 11 ते 15 जून 2025
राखीव दिवस: 16 जून
ठिकाण: लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन
सुरुवात: भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता
जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया मात्र या स्पर्धेत सगल दुसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
नक्की वाचा : तर विराट कोहली निवृत्ती मागे घेऊ शकतो! वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचा दावा
ICC WTC Final 2025 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जॉश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, स्कॉट बोलंड, नॅथन लायन, मॅट कुह्नेमन.
राखीव खेळाडू: ब्रेंडन डॉगेट
नक्की वाचा :श्रेयस अय्यरसाठी टेस्ट टीमचे दरवाजे बंद झाले आहेत का? हेड कोच गंभीरनं दिलं उत्तर
ICC WTC Final 2025 सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
टोनी डी झोरझी, रायन रिकेल्टन, एडन मार्करम, टेम्बा बवुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, वियान मुल्डर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी नगिदी, डेन पॅटर्सन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी.
जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी बक्षिसाच्या रकमेत आयसीसीने घसघशीत वाढ केली आहे.
स्पर्धेसाठीच्या बक्षिसाची रक्कम: 49.34 कोटी रुपये
विजेत्याला मिळणारी रक्कम- 30.84 कोटी रुपये
उपविजेत्याला मिळणारी रक्कम: 18.50 कोटी रुपये
यापूर्वी झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला 13.70 कोटी रुपये मिळाले होते तर उपविजेत्याला 6.85 कोटी रुपये मिळाले होते.
आतापर्यंत काय घडले ?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या गुणतालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांना लोळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतामध्ये टीम इंडियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत बरोबरी साधली होती.यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचीही या स्पर्धेतील कामगिरी आतापर्यंत उत्तम राहिली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतावर 3-1 असा मालिका विजय मिळवला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला, पाकिस्तानातच जाऊन लोळवलं होतं. त्यानंतर या संघाने न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरूद्धही विजय मिळवत या अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले होते.
WTC Live Streaming : सामना कुठे पाहाल ?
भारतातील क्रिकेटप्रेमी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतील. या सामन्याची कॉमेंट्री इंग्रजी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये ऐकायला मिळू शकेल. जिओ हॉटस्टारवरही हा सामना लाईव्ह पाहाता येईल.