जाहिरात

IND vs WI: 'इतिहासची पुनरावृत्ती होवू शकते' भारत-विंडीज सामन्यापूर्वी कोच डॅरेन सॅमीचं वक्तव्य व्हायरल

वेस्ट इंडिज पुर्ण तयारीनं मैदानात उतरणार आहे. तर भारताला या सामन्या करो या मरोची स्थिती असणार आहे.

IND vs WI: 'इतिहासची पुनरावृत्ती होवू शकते' भारत-विंडीज सामन्यापूर्वी कोच डॅरेन सॅमीचं वक्तव्य व्हायरल
  • टी-20 विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकात्यात होणार आहे
  • वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी २०१६ मध्ये भारताला पराभूत केल्याची आठवण करून दिली
  • वेस्ट इंडियजचा शिमरॉन हेटमायर सध्या फॉर्मात आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

India vs West Indies T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होत आहे.  कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ही चुरशीची लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. "हा सामना 'डेव्हिड विरुद्ध गोलियाथ' असा असला, तरी इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करू शकतो," असे सॅमी यांनी म्हटले आहे. 2016 मध्येही वेस्ट इंडिजने भारताला याच ठिकाणी टी-20 विश्वचषकातील सामन्यात पराभूत केले होते. ऐवढेच नाही तर त्यावेळी वेस्ट इंडिजनेच वर्ल्डकप जिंकला होता. याची आठवण त्यांनी करून दिली.

सॅमीच्या मते, 80 हजार प्रेक्षक आणि 1.4 अब्ज भारतीयांचा पाठिंबा असलेल्या टीम इंडियाला हरवणे सोपे नसेल. मात्र, दबावाखाली खेळण्याची सवय त्यांच्या संघाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 83/7 अशा कठीण परिस्थितीतून सावरून 176 धावांपर्यंत मजल मारल्याने विंडीजचा आत्मविश्वास उंचावला आहे. शिमरॉन हेटमायर सध्या फॉर्मात आहे. संघातील अष्टपैलू खेळाडूंचा ही मोठा भरणा आहे. हिच विंडीजची मोठी ताकद ठरणार आहे असं ही तो म्हणाला. विश्वचषक जिंकायचा असेल, तर भारताला हरवणे अनिवार्य आहे, असेही सॅमीने स्पष्ट केले.

नक्की वाचा - IND vs WI: पावसामुळे भारत- वेस्टइंडीज सामना रद्द झाला तर सेमी फायनलमध्ये कोण? 'हे' आहे समिकरण

वेस्ट इंडिजचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विशेषतः खालच्या फळीतील फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दाखवलेला चमत्कार भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. हेटमायर सध्या रिलॅक्स असून त्याचे लक्ष केवळ मोठ्या फटकेबाजीवर आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या 'इतिहासाला' पूर्णविराम देऊन २1016 चा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. आता ईडन गार्डन्सवर 'कॅरेबियन पॉवर' चालणार की 'टीम इंडिया'चा जलवा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - Pune News: युद्धाचा फटका पुण्याच्या विद्यार्थ्यांना, दुबईत 80 विद्यार्थी अडकले, अंगावर काटा आणणारे Video

वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी जुन्या जखमांवर मीठ चोळत भारतीय चाहत्यांना डिवचले आहे. 2016 च्या उपांत्य फेरीत भारताचे स्वप्न भंगवणाऱ्या त्या रात्रीची आठवण सॅमीने करून दिली. "भारताकडे चाहत्यांची मोठी शक्ती असली, तरी आम्ही त्यांना त्यांच्याच घरात नमवण्यास सज्ज आहोत," असे सॅमीने ठामपणे सांगितले. त्यामुळे वेस्ट इंडिज पुर्ण तयारीनं मैदानात उतरणार आहे. तर भारताला या सामन्या करो या मरोची स्थिती असणार आहे. 

दोन्ही संघ 
भारत: संजू सैमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

वेस्टइंडीज: ब्रैंडन किंग, शाई होप (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोवमैन पॉवेल, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मैथ्यू फोर्ड, गुडाकेश मोटी, शमर जोसेफ, जॉनसन चार्ल्स, अकील होसेन, जेडन सील्स, क्वेंटिन सैम्पसन
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com