जाहिरात

VIDEO: वैभव सूर्यवंशी संतापला! थेट अंगावर धावला, धक्का दिला; मॅचमध्ये जे झालं त्याने क्रिडाविश्व हादरलं

प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेचा वरिष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू निरोशन डिकवेलाने हस्तक्षेप करून परिस्थिती चिघळण्यापासून रोखली.

VIDEO: वैभव सूर्यवंशी संतापला! थेट अंगावर धावला, धक्का दिला; मॅचमध्ये जे झालं त्याने क्रिडाविश्व हादरलं

Vishen Halambage vs Vaibhav Sooryavanshi Fight: श्रीलंकेत 'अ' संघांचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत, यजमान संघाने सोमवारी सुपर ओव्हरमध्ये भारत 'अ' संघाचा पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सुपर थरार पाहायला मिळाला. भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेंच्या खेळाडूंमध्ये ही बाचाबाची केली. वेळीच हस्तक्षेप केल्याने खेळाडूंमधील झटापट थोडक्यात टळली. श्रीलंकेकडून सुपर ओव्हरचे षटक टाकणाऱ्या श्रीलंका 'अ' संघाचा वेगवान गोलंदाज कुगाथास मथुलनने त्याच्यावर शाब्दिक हल्ला चढवला ज्यानंतर हा वाद सुरु झाला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या... 

IND-W vs PAK-W: दिप्ती शर्माने पंजा काढला, वर्ल्डकपमध्ये भारताची दमदार सुरुवात, पाकड्यांना चारली पराभवाची धूळ

सुपर ओव्हरमध्ये सुपरड्रामा.. 

प्रथम फलंदाजी करताना भारत 'अ' संघाने ४९.२ षटकांत सर्व गडी गमावून २६५ धावा केल्या. श्रीलंका 'अ' संघानेही तितक्याच षटकांत ९ गडी गमावून २६५ धावा केल्या, ज्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.  अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे, पंचांनी सुरुवातीला सुपर ओव्हर घेण्यास नकार दिला. यावरून तिलक वर्मा आणि भारतीय खेळाडूंचा पंचांशी जोरदार वाद झाला. स्पर्धेच्या नियमांनुसार फ्लडलाइट्सना परवानगी नसल्याने, तिलक वर्मा सुपर ओव्हर घेण्याचा आग्रह करत होता.  पंच अखेरीस सुपर ओव्हर घेण्यास तयार झाले.

श्रीलंका 'अ' संघाने सुपर ओव्हरमध्ये १६ धावा केल्या होत्या. यानंतर, इंडिया 'अ' संघाचे खेळाडू मैदानाबाहेर आले आणि फलंदाजी करण्यासाठी पॅड्स घालण्यास सुरुवात केली.  अशातच अचानक पंचांनी त्यांना परत बोलावले आणि आधीचा चेंडू नो-बॉल होता आणि अजून एक चेंडू टाकायचा बाकी असल्याचे सांगितले.  यामुळे भारतीय खेळाडू आणि पंच यांच्यात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक चकमक झाली.
टीम इंडियाने सहमती दर्शवली.

अखेरीस भारतीय संघ एक अतिरिक्त चेंडू टाकण्यास तयार झाला, पण हा शेवटचा चेंडू बाय ठरल्याने श्रीलंका संघ १६ धावांवर बाद झाला. भारतीय संघाला १७ धावांचे लक्ष्य देण्यात आले. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी १७ धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघ स्लिंगर गोलंदाज कगुथास मथुलन (मलिंगासारखी गोलंदाजी शैली) विरुद्ध केवळ ९ धावाच करू शकला आणि सलग दुसरा सामना हरला. सूर्यवंशीने मथुलनच्या शेवटच्या तीन चेंडूंचा सामना केला आणि एका चौकारासह केवळ सहा धावा केल्या.

IND vs AFG: भयंकर अन्याय! सेंच्युरी करूनही जागा मिळेना...गिल आणि गंभीर दिग्गज मुंबईकरला कधी देणार न्याय?

वैभव सूर्यवंशी संतापला, अंगावर धावला, ढकललं 

 पराभवानंतर भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकेच्या खेळाडूंनी आक्रमकपणे जल्लोष करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर वैभव सूर्यवंशी संतापला आणि गोलंदाज मथुलनच्या दिशेने रागाने धावताना चित्रित केले, पण त्याचा सहकारी विशन हलंबगेने त्याला अडवले. यावेळी वैभव सूर्यवंशी एका श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाला ढकलताना दिसला, ज्याने प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेचा वरिष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू निरोशन डिकवेलाने हस्तक्षेप करून परिस्थिती चिघळण्यापासून रोखली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com