भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामना रोमांचक ठरला. यात भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळवला. ओव्हल कसोटी सामना जिंकण्याची इंग्लंड आणि भारत या दोघांनाही संधी होती. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर मोहम्मद सिराज याने इंग्लंडला आणखी दोन दणके दिले. जेमी स्मिथ आणि जेमी ओव्हरटन यांना त्याने माघारी पाठवले. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 8 बाद 355 अशी झाली होती. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा याने जोश टंग याला क्लिन बोल्ड केले. त्यानंतर जखमी असलेला ख्रिस वोक्स बॅटींगसाठी आला. एक हातानाने त्याने बॅटींग केली. अॅटकिन्सन याने त्यानंतर एका बाजू लावून धरली. त्याने महम्मद सिराजला षटकार ठोकत इंग्लंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ एका विकेटची गरज होती. शेवटी मोहम्मद सिराज याने अॅटकिन्सन याला क्लिन बोल्ट करत भारताला थरारक विजय मिळवून दिला. इंग्लडचा डाव 367 धावांत आटोपला. मोहम्मद सिराजचे पाच विकेट घेतल्या. भारताने इंग्लंडवर सहा धावांनी विजय मिळवला. शिवाय पाच कसोटी सामन्यांची मालिकाही भारताने बरोबरीत सोडवली. भारताने दोन तर इंग्लंडनेही दोन कसोटी सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहीला.
चौथ्या दिवसाचा खेळ खराब लाईटमुळे थांबवण्यात आला होता. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती. तर भारताला चार विकेट्स विजयासाठी हव्या होत्या. ज्यावेळी खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडचा स्कोर 339 वर 6 विकेट्स असा होता. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या बेन डकेट आणि ऑली पोप यांना लवकर आऊट करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं होतं. मात्र त्यानंतर ज्यो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले होते. हॅरी ब्रुक यांने तर आपले शतक पूर्ण केले. त्या पाठोपाठ जो रूटनेही शतक केले. हे दोघेही बाद झाल्यानंतर मात्र मॅचमध्ये एक रोमांच निर्माण झाला होता.
IND Vs ENG: ओव्हल टेस्टमध्ये राडा! के एल राहुल थेट पंचांना नडला; पाहा VIDEO
जो रुटला 105 धावांवर प्रसिद्ध कृष्णाने बाद केलं. त्यानंतर जेकब बेथेल ही पाच धावांवर बाद झाला. त्यामुळे सामन्याला अचानक कलाटणी मिळाल्याची स्थिती निर्माण झाली. भारतीय बॉलर्सनी जोरदार गोलंदाजी केली. त्यामुळे तळाच्या फलंदाजांना खेळताना अडचण निर्माण होत होती. मात्र शेवटी खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती. तर भारताल विजयासाठी चार विकेट हव्या होत्या.
Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय?
यशस्वी जयस्वालने ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकले होते. त्याने 118 धावांची शानदार खेळी केली. या कसोटी मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. याशिवाय रवींद्र जडेजाने 66 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 53 धावांची वेगवान खेळी केली. ज्याच्या मदतीने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जोश टोंगने सर्वाधिक 5 बळी घेतले. गस अॅटकिन्सनने तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जेमी ओव्हरटनने दोन बळी घेतले. ओव्हल मैदानावर इतके मोठं लक्ष या आधी कोणत्याच संघाने दिले नव्हते.