भारताने इंग्लंडवर एजबस्टन इथल्या दुसऱ्या कसोटी सामन्या दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी झाली आहे. पहिल्या कसोटीतील पराभवाची परतफेड भारताने दुसरी कसोटी जिंकत केली आहे. भारताने शेवटच्या दिवशी इंग्लंड समोर विजयासाठी 608 धावांचे लक्ष ठेवले होते. चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडच्या 3 फलंदाजांना बाद करत सामन्यावर पकड मिळवली होती. पाचव्या दिवसाची सुरूवात झाल्यानंतर आकाश दीपने इंग्लंडला बॅक टू बॅक दोन दणके दिले. त्यामुळे भारताची सामन्यावर आणखी घट्ट पकड मिळवली. शेवटी भारताने इंग्लंडवर 336 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाच कसोटी मालिकांच्या सिरीज मध्ये एक एक बरोबर ही भारताने केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ओली पोप आणि हॅरी ब्रुक यांना आकाश दीपने बाद केले. त्यानंतर मात्र कर्णधार बेन स्टोक आणि जीमी स्मिथ यांनी चिवट फलंदाजी केली. मात्र लंचच्या आधी बेन स्टोकला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा पाय आणखी खोलात गेला. त्यनंतर मात्र जीमी स्मिथ यांने एक बाजू लावून धरली होती. त्यानंतर आलेला ख्रिस वोक्स याने ही प्रतिकार केला. पण त्याला प्रसिद्ध कृष्णाने आऊट केले. त्याचा झेल मोहम्मद शिराजने घेतला. भारत आणि विजयाच्या मध्ये उभा असलेल्या जेम स्मिथचा काटा आकाश दीपने काढला. त्याने 88 धावा केल्या. ही आकाश दीपची पाचवी विकेट होती.
ट्रेंडिंग बातमी - Shubman Gill : शुबमन गिलनं घडवला इतिहास, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला!
जेम स्मिथला आऊट केल्यानंतर भारताने या सामन्यावर अजूनच पकड घट्ट केली. आकाश दिपने जोरदार बॉलिंगचे प्रदर्शन करत सहा विकेट घेतल्या. भारताच्या विजयात आकाश दीपचा वाटा मोठा होता. त्याने कसोटी सामन्यात दोन्ही डाव मिळून दहा विकेट घेतल्या. जॉश टंगला रविंद्र जडेजाने बाद केला. त्याच अप्रतिम झेल महम्मद शिराजने पकडला. एजबॅस्टनमध्ये भारताला इतिहास घडवण्याची संधी होती. कारण यापूर्वी आठ वेळा येथे खेळूनही अद्याप टीम इंडियाला एकही टेस्ट जिंकता आलेली नव्हतकी. सात वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तर 1986 मध्ये एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे हा विजय भारतासाठी खास आहे. 1967 साली भारताने या मैदानावर पहिली टेस्ट खेळली होती. टीम इंडियानं दुसरी इनिंग 6 आऊट 427 रन्सवर घोषित केली होती. इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी 608 रन्सचं टार्गेट होते. पण इंग्लंडचा डाव 271 धावांवर कोसळला.