
Shubman Gill : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनं आणखी एक सेंच्युरी झळकावली आहे. गिलनं पहिल्या इनिंगमध्ये 269 रन्स केले होते. त्यापाठोपाठ गिलनं दुसऱ्या इनिंगमध्येही सेंच्युरी झळकावली. गिलनं या इनिंगमध्ये 161 रन्स काढले. गिलनं या सेंच्युरीसह आणखी एक मोठा रेकॉर्ड केला आहे.
गिलनं कॅप्टन म्हणून पदार्पणाच्या टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅटर हा रेकॉर्ड केलाय. यापूर्वी हा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर होता. विराट 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सर्वात प्रथम टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन झाला होता. त्या सीरिजमध्या विराटनं महेंद्रसिंह धोनीकडून कॅप्टनसी स्वीकारली होती. त्यानं केवळ दोन टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं होतं.
विराटनं त्या 2 टेस्टमधील 4 इनिंगमध्ये 449 रन्स केले होते. शुबमन गिलनंही पहिल्या दोन टेस्टमधील 4 इनिंगमध्येच विराटला मागे टाकलंय. शुबमन गिलनं 4 इनिंगमध्ये आत्तापर्यंत 578 रन्स केले आहेत. त्यामध्ये त्याची सरासरी 192.66 इतकी आहे.
(नक्की वाचा : Shubman Gill: गिलविरुद्ध इंग्रजांचा रडीचा डाव, टीम इंडियाच्या कॅप्टननं घातले दात घशात! पाहा Video )
कॅप्टन म्हणून पदार्पणाच्या सीरिजमध्ये सर्वाधिक रन्स करणारे भारतीय
578* - शुभमन गिल वि. इंग्लंड (परदेशात, 2025, 4 इनिंग)
449 - विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया (परदेशात, 2014/15, 4 इनिंग)
347 - विजय हजारे वि. इंग्लंड (मायदेशात, 1951/52, 7 इनिंग)
319 - नारी कॉन्ट्रॅक्टर वि. पाकिस्तान (मायदेशात, 1960/61, 6 इनिंग)
305 - दिलीप वेंगसरकर वि. वेस्ट इंडिज (मायदेशात, 1987/88, 5 इनिंग)
एजबॅस्टनमध्ये भारताला इतिहास घडवण्याची संधी आहे, कारण यापूर्वी आठ वेळा येथे खेळूनही अद्याप टीम इंडियाला एकही टेस्ट जिंकता आलेली नाही. सात वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तर 1986 मध्ये एक सामना अनिर्णित राहिला होता.
टीम इंडियानं दुसरी इनिंग 6 आऊट 427 रन्सवर घोषित केली आहे. आता इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी 608 रन्सचं टार्गेट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world