India Vs New Zealand Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ग्रुप स्टेजचा अखेरचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल करत न्यूझीलंडचा दारुण पराभव केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 250 धावांचे आव्हान पूर्ण करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या 205 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून वरुण चक्रवतीने सर्वाधिक पाच बळी घेतले.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चॅम्पियन्स ट्रॉफी (चॅम्पियन्स ट्रॉफी 2025) गट टप्प्यातील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये पार पडला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करत 249 धावा केल्या, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या 79 धावांच्या खेळीने महत्त्वाचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात, न्यूझीलंड 21 धावांनी लक्ष्यापासून दूर राहिला. केन विल्यमसनने 81 धावांची खेळी केली, पण तो त्याच्या संघाला विजयी करू शकला नाही. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीमुळे भारताने अ गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक पाच बळी घेत न्यूझीलंडच्या संघाला रोखण्याची किमया केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाला तिसऱ्याच षटकात शुभमन गिल आऊट झाल्याने पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा 15 धावांवर आणि विराट कोहली 30 धावांवर आऊट झाला. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने 98 चेंडूंमध्ये 79 धावांची खेळी केली. त्याला अक्षर पटेलने 42 धावा ठोकत साथ दिली. न्यूझीलंडकडून एम हेनरीने सर्वाधिक पाच बळी घेतले.
या विजयासोबतच भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट अ मध्ये तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडियाने यापूर्वी बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना प्रत्येकी 6 गडी राखून पराभूत केले होते. आता न्यूझीलंडचाही 44 धावांनी पराभव झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दुबई क्रिकेट ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.