जाहिरात

Budget session 2025: 'विरोधकांची स्थिती हम आप के है कौन सारखी' विरोधकांना फडणवीसांनी डिवचले

विरोधक जे प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे असं ही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Budget session 2025: 'विरोधकांची स्थिती हम आप के है कौन सारखी' विरोधकांना फडणवीसांनी डिवचले
मुंबई:

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. शिवाय हे करण्याचे कारण सांगणारे नऊ पानाचे पत्र ही मुख्यमंत्र्यांना दिलं. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना डिवचलं आहे. विरोधी पक्षाने नऊ पानाचे पत्र दिले आहे. त्यात नऊ जणांची नावं आहेत. पण सह्या ह्या फक्त सात जणांच्या आहेत. त्यामुळे विरोधकांची स्थिती हम साथ साथ है सारखी  नाही. तर हम आपके है कौन? अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे विरोधकांचे काम कसं चाललं आहे हे पाहीलं पाहीजे, असा टोला फडणवीसांना लगावला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेश होतो. त्यात विरोधतांना सकारात्मक चर्चा करता आली असती. त्यांनी ती संधी बहिष्कार टाकून दडवडली आहे. मात्र संवात होत नाही असा आरोप विरोधकांनी केला. पण तेच संवाद साधण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला. चहापानाला ते आले असते तर संवाद झाला असता असंही फडणवीस यावेळी म्हणाले. शिवाय ज्या कारणासाठी बहिष्कार टाकला आहे त्याबाबतचे पत्र विरोधकांनी दिले आहे. पण त्यांनी हे सर्व आरोप बातम्यांच्या आधारावर केले आहेत. त्यांनी त्यावरचे सरकारे खुलासे वाचले असते तर त्यांना ऐवढे पत्र लिहीण्याची गरज लागली नसती असंही त्यांनी सांगितलं. मात्र विरोधक जे प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे असं ही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Budget session: शिंदे -पवारांमुळे फडणवीस अडचणीत? सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

विरोधकांची संध्या कमी आहे. तरीही विरोधकांना आम्ही कमी लेखणार नाही. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नांना सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करु असंही फडणवीस यावेळी म्हणाले. हे अधिवेशन चार आठवडे चालेल. ते कुठेही गुंडाळले जाणार नाही. या अधिवेशनात दोन महत्वाच्या विषयांवर विशेष चर्चा होणार असल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं. 10 तारखेला अर्थ संकल्प सादर केला जाईल. चांगला आणि संतुलीत अर्थसंकल्प आम्ही मांडू. राज्यावर आर्थिक ताण असला तरी त्यातून आर्थिक शिस्त पाळण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यातूनच आम्ही समतोल अर्थसंकल्प राज्याला देऊ असं फडणवीस यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? CM फडणवीसांच्या प्रतिक्रियेने राजकारणात खळबळ; म्हणाले...

दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तर 10 तारखेला अर्थसंकल्प मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल संयुक्त सभागृहाला संबोधित करतील असंही त्यांनी सांगितलं.   विरोधी पक्षाकडे 50 आमदार आहेत. असं असलं तरी बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही. चार आठवड्याचं अधिवेशन चालेल. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे, असं अजित पवारांनीही स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातमी - Big News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, जळगावातील खळबळजनक घटना

तर अजित पवार अर्थसंकल्प पुन्हा मांडतील, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सध्या विरोधकांचा भलताच संकल्प सुरू आहे. आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे जास्त पानाचं पत्र त्यांनी लिहीलय की काय असा प्रश्नही या निमित्ताने शिंदे यांनी उपस्थित केला. आम्हाला मोठा विजय मिळाला आहे, म्हणून आमच्या डोक्यात हवा नाही. आमची जबाबदारी वाढली आहे. विरोधकांनी या अधिवेशनात कामकाजात भाग घ्यावा. त्यांनी प्रश्न मांडावेत. जे काम चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणावं. गेल्या अधिवेशनात ते सभागृहा ऐवजी पाऱ्यांवर जास्त दिसले असा टोलाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: