3 days ago

IND Vs PAK Match Live: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिय चषकासाठी सुपर फोरमध्ये सामना होत आहे. भारताने टॉस जिंकला आहे आणि पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचची प्रत्येक अपडेट तुम्हाला इथे मिळेल. 

Sep 22, 2025 00:03 (IST)

IND Vs PAK: टीम इंडियाचा विजय, पाकचा लागोपाठ पराभव

IND Vs PAK: टीम इंडियाचा विजय, पाकचा लागोपाठ पराभव  

आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पाडाव केला आहे. भारताने पाकिस्तानचा सहा विकेट राखत पराभव केला आहे. 18.5 ओव्हर्समध्येच भारताने 174 धावा केल्या. त्या बदल्यात चार विकेट गेल्या. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक  74 धावा केल्या. तर शुभमन गीलने 47 धावा केल्या. तर तिलक वर्माने 30 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून हॅरिस रौफ याने दोन विकेट घेतल्या. तर अबरार आणि फहीम अशरफ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. या विजयामुळे भारत सुपर फोरमध्ये टॉपवर पोहचला आहे. 

Sep 21, 2025 23:50 (IST)

IND Vs PAK Match Live: टीम इंडियाला आता 3 ओव्हर्समध्ये 19 धावांची गरज

IND Vs PAK Match Live: टीम इंडियाला आता 3 ओव्हर्समध्ये 19 धावांची गरज 

Sep 21, 2025 23:47 (IST)

IND Vs PAK Match Live: टीम इंडियाला चौथा झटका, संजू सॅमसन आऊट

IND Vs PAK Match Live:  टीम इंडियाला चौथा झटका, संजू सॅमसन आऊट झाला आहे. आणखी भारताला विजयासाठी 20  बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. 

Sep 21, 2025 23:44 (IST)

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाला चार ओव्हर्समध्ये 23 धावांची गरज

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाला चार ओव्हर्समध्ये 23 धावांची गरज आहे. भारताच्या तीन विकेट गेल्या आहेत. 

Advertisement
Sep 21, 2025 23:38 (IST)

IND Vs PAK Match Live: टीम इंडियाला अजून 30 धावांची गरज

IND Vs PAK Match Live:  टीम इंडियाला अजून 30 धावांची गरज आहे. पाच ओव्हर शिल्लक आहेत. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा मैदानात आहेत. 

Sep 21, 2025 23:33 (IST)

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाला आता 36 चेंडूत 40 धावांची गरज

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाला आता 36 चेंडूत 40 धावांची गरज  आहे मैदानात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा आहेत. भारताचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. 14 ओव्हर नंतर टीम इंडियाच्या  132 धावा झाल्या आहेत. 

Advertisement
Sep 21, 2025 23:27 (IST)

IND Vs PAK Match Live: टीम इंडियाला तिसरा झटका, 123 धावांत 3 बाद

IND Vs PAK Match Live:  टीम इंडियाला तिसरा झटका, 123 धावांत 3 बाद झाले आहे. शुभमन गील, अभिषेक शर्मा आणि सुर्यकुमार यादव हे बाद झाले आहेत. अभिषेक शर्मा 74 धावांत बाद झाला. त्याने  पाच सिक्स आणि सहा फोर लगावले. त्याला अबरारने कॅच आऊट केले. भारताला आणखी 48 धावांची गरज आहे. 

Sep 21, 2025 23:15 (IST)

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाला दुसरा झटका, सुर्या शुन्यावर बाद

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाला दुसरा झटका बसला आहे. सुर्यकुमार यादवने निराश केलं. तो शुन्यावर बाद झाला.  

Advertisement
Sep 21, 2025 23:11 (IST)

IND Vs PAK Match Live: शुभमन गीलचं अर्ध शतक हुकले, 47 धावांवर बाद

IND Vs PAK Match Live:  शुभमन गीलचं अर्ध शतक हुकले,  47  धावांवर बाद, फहीम अशरफने केले बाद. 

Sep 21, 2025 23:00 (IST)

IND Vs PAK Match Live: अभिषेक शर्मा, शुभमन गीलची शतकी सलामी

IND Vs PAK Match Live:  अभिषेक शर्मा, शुभमन गीलची शतकी सलामी दिली आहे. 8.4 ओव्हर्समध्ये टीम इंडियाची धावसंख्या शंभर झाली होती. 

Sep 21, 2025 22:57 (IST)

IND Vs PAK Match Live: अभिषेक शर्माने अवघ्या 23 बॉलमध्ये ठोकले अर्धशतक

IND Vs PAK Match Live: अभिषेक शर्माने अवघ्या 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. चौकार लगावत त्याने आपले अर्धशतक केले. यात त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले आहेत.  टीम इंडियाला अजून 72 चेंडूत 76 धावांची गरज आहे. शुभमन गील ही अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर आहे. 

Sep 21, 2025 22:53 (IST)

IND Vs PAK Match Live : 7 ओव्हर्सनंतर टीम इंडिया बिनबाद 85

IND Vs PAK Match Live : 7 ओव्हर्सनंतर टीम इंडिया बिनबाद 85 धावा केल्या आहेत. तर अभिषेक शर्मा हा आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे.  सातव्या ओव्हरमध्ये सतरा धावा कुटल्या गेल्या. 

Sep 21, 2025 22:48 (IST)

IND Vs PAK Match Live: पावर प्लेमध्ये टीम इंडियाने ठोकल्या 69 धावा

IND Vs PAK Match Live:  पावर प्लेमध्ये टीम इंडियाने 69 धावा ठोकल्या आहे. सहा ओव्हर्समध्ये अकरा पेक्षा जास्त सरासरीने या धावा केल्या आहेत. शुभमन गीलने 35 धावा तर  अभिषेक शर्माने 33 धावा ठोकल्या आहेत.  

Sep 21, 2025 22:42 (IST)

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण , 4.4 ओव्हर्समध्ये केल्या 50 धावा

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाच्या  50 धावा पूर्ण , 4.4 ओव्हर्समध्ये केल्या 50 धावा, पाच ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 55 धावा झाल्या आहेत. 

Sep 21, 2025 22:38 (IST)

IND Vs PAK Match Live : 4 ओव्हर्सनंतर टीम इंडिया 43 धावा

IND Vs PAK Match Live : 4 ओव्हर्सनंतर टीम इंडियाने 43 धावा केल्या आहेत.  चौथ्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने हल्लाबोल करत एक सिक्स आणि एक चौकार ठोकला. अभिषेक शर्मा 11 चेंडूत  21 धावांवर पोहोचला आहे.  

Sep 21, 2025 22:33 (IST)

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाच्या 3 ओव्हर्समध्ये 31 धावा

IND Vs PAK Match Live : टीम इंडियाच्या 3  ओव्हर्समध्ये 31 धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्मा 10 धावंवर खेळत आहे. तर शुभमन गील आक्रमक खेळी करत 11 चेंडूत 21 धावा ठोकल्या आहेत. 

Sep 21, 2025 22:30 (IST)

IND Vs PAK Match Live: अभिषेक शर्माचा कॅच सोडला, 9 धावांवर सोडला कॅच

IND Vs PAK Match Live:  अभिषेक शर्माचा कॅच सोडला, 9 धावांवर सोडला कॅच, एक जिवनदान अभिषेक शर्माला मिळालं आहे. शाहीन शहा आफ्रीदीच्या बॉलिंगवर त्याचा झेल सुटला. मात्र त्यानंतरच्याच बॉलवर शुभमन गीलने चौकार लगावत दबाव कमी केला. 

Sep 21, 2025 22:27 (IST)

IND Vs PAK Match Live : शुभमन गीलचा धडाका, बॅक टू बॅक चौके

IND Vs PAK Match Live : शुभमन गीलचा धडाका, बॅक टू बॅक चौके लगावले आहे. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोर दोन ओव्हर्सनंतर बिनबाद 19 झाला आहे. 

Sep 21, 2025 22:24 (IST)

IND Vs PAK Match Live : भारताची दमदार सुरूवात, एक ओव्हरमध्ये नऊ रन्स

IND Vs PAK Match Live : भारताची दमदार सुरूवात झाली आहे.  एक ओव्हरमध्ये नऊ रन्स केल्या आहे. सामन्याच्या पहिल्याच बॉलवर अभिषेक शर्माने सिक्स ठोकत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.  

Sep 21, 2025 22:20 (IST)

IND Vs PAK Match Live: भारताच्या डावाला सुरूवात, पहिल्याच बॉलवर सिक्स

IND Vs PAK Match Live:  भारताच्या डावाला सुरूवात झाली आहे. डावाच्या  पहिल्याच बॉलवर अभिषेक शर्माने सिक्स मारला आहे. शहानशहा आफ्रीदीच्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारला आहे. 

Sep 21, 2025 22:18 (IST)

IND Vs PAK Match Live: भारताच्या डावाला सुरूवात, शुभमन गील- अभिषेक शर्मा मैदानात

IND Vs PAK Match Live:  भारताच्या डावाला सुरूवात, शुभमन गील- अभिषेक शर्मा मैदानात 

Sep 21, 2025 22:03 (IST)

IND Vs PAK Match Live : पाकिस्तानने केल्या 171 धावा

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 171 केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी 172 धावांची गरज आहे. पाकिस्तानच्या पाच विकेट गेल्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान याने सर्वाधिक 58 धावा केल्या. शिवम दुबेने दोन विकेट्स घेतल्या. तर हार्दीक पंड्या आणि  कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. एक जण रन आऊट झाला. शेवटच्या आठरा चेंडूत पाकिस्तानने जवळपास 40 धावा काढल्या आहेत. फहीम अशरफ यांने शेवटी येत आठ चेंडूत 20  धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 171  धावा करता आल्या. भारताकडून पाच झेल सोडण्यात आले. 

Sep 21, 2025 21:51 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानला पाचवा गडी बाद, डाव गडगडला

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानला पाचवा गडी बाद, डाव गडगडला आहे. मोहम्मद नवाझ रन आऊट झाला आहे. त्यानंतर फहीम अशरफचा पुढच्याच बॉलवर शुमन गीलने झेल सोडला आहे. १९ ओव्हर्सनंतर पाकिस्तानची धावसंख्या 157  झाली आहे. 

Sep 21, 2025 21:44 (IST)

IND Vs PAK Match Live : 18 ओव्हर्सनंतर पाकिस्तान 146 रन्स

IND Vs PAK Match Live : 18  ओव्हर्सनंतर पाकिस्तानने 146 रन्स केल्या आहेत. अजून दोन ओव्हर्स शिल्लक आहेत. शिवम दुबेच्या चारही ओव्हर्स पुर्ण झाल्या आहेत. त्याची चौथी ओव्हर महागडी ठरली. त्यात त्याने पंधरा धावा दिल्या.  

Sep 21, 2025 21:26 (IST)

IND Vs PAK Match Live : पाकिस्तानच्या धावसंख्येला लगाम

IND Vs PAK Match Live :  पाकिस्तानच्या धावसंख्येला लगाम लागला आहे. गेल्या पाच ओव्हर्समध्ये एकही चौकार लगावता आला नाही.  त्यामुळे पाकिस्तानच्या चांगल्या सुरूवातीनंतर त्यांच्या धावसंख्येला लगाम लागला आहे. शिवम दुबेने पाक बॅट्समनला बांधून ठेवलं आहे. 

Sep 21, 2025 21:24 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानला चौथा झटका, शिवम दुबेने घेतली दुसरी विकेट

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानला चौथा झटका, शिवम दुबेने घेतली दुसरी विकेट  फरहानला दुबेने झेल बाद केले. त्याचा कॅच कॅप्टन सुर्यकुमार यादवने घेतला. फरहानने 45 बॉलमध्ये 68 धावा केल्या. फरहानला दोन वेळा जिवदान मिळाले. त्याने तीन सिक्स आणि पाच फोर मारले. 

Sep 21, 2025 21:19 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानचा तिसरा गडी बाद, धावांनाही लागला ब्रेक

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानचा तिसरा गडी बाद झाला आहे.  धावांनाही ब्रेक लागला आहे. कुलदीप यादव यांनी तिसरी विकेट घेतली. हुसेन तलत दहा धावा काढून बाद झाला. 

Sep 21, 2025 21:08 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानच्या धावांचे शतक पूर्ण, 12 व्या ओव्हरला केल्या शंभर

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानच्या धावांचे शतक पूर्ण, 12 व्या ओव्हरला केल्या शंभर धावा 

Sep 21, 2025 21:02 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानला दुसरा झटका, सैमला शिवम दुबेने केले आऊट

IND Vs PAK Match Live:  पाकिस्तानला दुसरा झटका, सैमला शिवम दुबेने केले आऊट , 72 धावांची भागिदारी शिवम दुबेने तोडली. अभिषेक शर्माने सैमचा कॅच पकडला. त्याने 21  धावा केल्या. पाकिस्तानची धावसंध्या 2 बाद 93 झाली आहे. 

Sep 21, 2025 20:55 (IST)

IND Vs PAK Match Live: फरहान याचं अर्धशतक पूर्ण, ३४ बॉलमध्ये केल्या ५१

IND Vs PAK Match Live:  फरहान याचं अर्धशतक पूर्ण, ३४ बॉलमध्ये केल्या ५१ धावा. फरहानला दोन जिवदान देण्यात आले. त्याचा त्याने फायदा घेत अर्धशतक ठोकलं आहे. 

Sep 21, 2025 20:52 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तान 9 ओव्हर्सनंतर केल्या 83 धावा 1 आऊट

IND Vs PAK Match Live:  पाकिस्तान 9  ओव्हर्सनंतर केल्या 83 धावा 1 आऊट 

Sep 21, 2025 20:46 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानने गिअर चेंज केला, आक्रमक फलंदाजी

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानने गिअर चेंज केला आहे. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. आठव्या ओव्हर पर्यंत पाकिस्तानच्या 71 धावा झाल्या आहेत.  

Sep 21, 2025 20:42 (IST)

IND Vs PAK Match Live: पावर प्लेमध्ये पाकिस्तानने केल्या 61 धावा

IND Vs PAK Match Live:  पावर प्लेमध्ये पाकिस्तानने 61 धावा केल्या आहेत. जवळपास आठच्या सरासरीने या धावा केल्या आहेत. मात्र यावेळी टीम इंडियाकडून दोन कॅच ड्रॉप करण्यात आले. 

Sep 21, 2025 20:33 (IST)

IND Vs PAK Match Live: कुलदीप यादवने सोडला सोपा कॅच, सामन्यातला दुसरा कॅच सोडला

IND Vs PAK Match Live:  कुलदीप यादवने सोडला सोपा कॅच, सामन्यातला दुसरा कॅच सोडला, फरहानचा वरूण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर हा कॅच सोडला आहे. 

Sep 21, 2025 20:24 (IST)

IND Vs PAK Match Live : पाकिस्तानच्या 3 ओव्हर्समध्ये 26 धावा

IND Vs PAK Match Live :  पाकिस्तानच्या 3 ओव्हर्समध्ये 26 धावा केल्या आहेत. तर त्यांचा एक बॅटर आऊट झाला आहे. 

Sep 21, 2025 20:17 (IST)

IND Vs PAK Match Live: पाकिस्तानला पहिला झटका, फकर 15 धावांवर आऊट, हार्दीकने घेतली विकेट

IND Vs PAK Match Live:  पाकिस्तानला पहिला झटका, फकर 15 धावांवर आऊट, हार्दीकने घेतली विकेट, फकरने 9 बॉलमध्ये 15 धावा केल्या. त्याच कॅच संजू सॅमसनने घेतला. थर्ड अंपायने त्याला आऊट  दिले. 

Sep 21, 2025 20:13 (IST)

IND Vs PAK Match Live : बुमराच्या पहिल्या ओव्हरमध्ये काढल्या 11 रन्स

IND Vs PAK Match Live :  बुमराच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स काढल्या आहेत. त्यात दोन चौकारांचाही समावेश आहे. दुसऱ्या ओव्हरनंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद 17 झाली आहे. फरान सहा धावांवर तर इमान अकरा धावांवर खेळत आहे.  

Sep 21, 2025 20:05 (IST)

IND Vs PAK Match Live: अभिषेक शर्माने फरहानचा कॅच सोडला

IND Vs PAK Match Live: अभिषेक शर्माने फरहानचा कॅच सोडला आहे. हार्दीक पंड्याच्या बॉलिंगवर त्याने हा कॅच सोडला. त्यावेळी तो शुन्य धावांवर खेळत होता.  पाकिस्तानने पहिल्या ओव्हरमध्ये सहा धावा केल्या आहेत. 

Sep 21, 2025 20:01 (IST)

IND Vs PAK Match Live: भारत पाकिस्तान मॅचला सुरूवात, मॅचची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

IND Vs PAK Match Live: भारत पाकिस्तान मॅचला सुरूवात, हार्दीक पांड्या टाकतोय पहिली ओव्हर. 

Sep 21, 2025 19:55 (IST)

IND Vs PAK Match Live: मॅच आधी दोन्ही देशाचे राष्ट्रगीताला सुरूवात

IND Vs PAK Match Live: मॅच आधी दोन्ही देशाचे राष्ट्रगिताला सुरूवात झाली आहे. आधी पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. त्यानंतर भारताचे राष्ट्रगीत झाले. 

Sep 21, 2025 19:49 (IST)

IND Vs PAK Match Live: टीम इंडियात दोन बदल

IND Vs PAK Match Live: टीम इंडियात दोन बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियामध्ये बॉलर जसप्रित बुमरा आणि वरुण चक्रवतीचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांना ओमन विरुद्धच्या सामन्यात विश्वांती देण्यात आली होती. ते पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आता खेळणार आहे. पाकिस्तानच्या संघात ही दोन बदल करण्यात आले आहेत. 

Sep 21, 2025 19:44 (IST)

IND Vs PAK Match Live: टीम इंडियाने टॉस जिंकला

IND Vs PAK Match Live: टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन सुर्यकुमार यादवने टॉस जिंकत पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सुपर फोरच्या या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणार आहे.