India Vs Pakistan Asia Cup Final 2025: क्रिडाप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि सुपर संडे ठरणार आहे. आशिया स्पर्धा 2025 चा फायनलचा सामना आज होणार असून भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असतील. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत- पाकमध्ये लढत होणार असल्याने संपूर्ण देशाचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने पाकिस्तानला दोन वेळा धुळ चारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही टीम इंडियाचे पारडे जड आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघच बाजी मारणार याचीच ५ महत्त्वाची कारणे जाणून घ्या.
पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला ते जगात अव्वल का आहेत हे दाखवून दिले. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकला ७ विकेट्सने पराभूत केले आणि नंतर सुपर ४ मध्ये ६ विकेट्सने पराभूत केले. यावरुनच हे दाखवून दिले की टीम इंडिया विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या कोणत्याही रणनिती कामी आलेली नाहीत.
Suryakumar Yadav: ICC ला खुपला 'पहलगाम'चा उल्लेख, फायनलपूर्वी सुर्यावर मोठी कारवाई
टीम इंडियाची तगडी फलंदाजी
अंतिम सामन्यापूर्वी भारताचा अभिषेक शर्मा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये आहे हे खरे आहे. परंतु पाकिस्तानकडे साहिबजादा फरहान देखील आहे, परंतु दोघांमध्ये तुलना करता येत नाही. कर्णधार सूर्यकुमारने मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नसली तरी, तो काय करू शकतो याची खात्री आहे. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे टी-२० क्रमवारीत जगातील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये आहेत, तर एकही पाकिस्तानी खेळाडू नाही यावरून स्पष्ट होते.
भेदक मारा
पाकिस्तान सुरुवातीपासूनच आपल्या गोलंदाजांबद्दल बढाई मारत आहे, परंतु कुलदीप यादवने नंबर वन गोलंदाज म्हणून १३ विकेट्स घेतल्याने भारत येथेही वर्चस्व गाजवणार असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, भारताकडे स्फोटक बुमराह आहे, जो महत्त्वाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो. तसेच आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला वरुण चक्रवर्तीही अखेरच्या सामन्यामध्ये झळकण्याची शक्यता आहे.
जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर
जरी हार्दिक पंड्याची कामगिरी आतापर्यंत त्याच्या रँकिंगनुसार टिकली नाही, परंतु २३८ गुणांसह टी-२० रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले त्याचे स्थान हे महत्त्वाचे आहे. मोठ्या टप्प्याचा विचार केला तर हार्दिकच्या बॅट आणि बॉलची तळपू शकते. त्यामुळे ऑल राऊंडर म्हणून त्याचीही कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
५. रेकॉर्डमध्ये टॉप
पाकिस्तानला हरवण्याचे पाचवे सर्वात मोठे कारण म्हणजे टी-२० मध्ये भारताचा त्यांच्याविरुद्धचा रेकॉर्ड. २००७ मध्ये या फॉरमॅटची सुरुवात झाल्यापासून, पाकिस्तानने बहुतेक वेळा टीम इंडियाला सातत्याने पराभूत केले आहे. दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी भारताने ११ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त ३ सामने जिंकले आहेत.