जाहिरात

IND vs PAK Final: आशिया कप फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 3 खेळाडू जखमी, हार्दिक-अभिषेक खेळणार नाहीत?

IND vs PAK Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील फायनल मॅच रविवारी (28 सप्टेंबर) होत आहे.

IND vs PAK Final: आशिया कप फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 3 खेळाडू जखमी, हार्दिक-अभिषेक खेळणार नाहीत?
IND vs PAK Final: टीम इंडियाची फायनलपूर्वी काळजी वाढली आहे.
मुंबई:

IND vs PAK Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील फायनल मॅच रविवारी (28 सप्टेंबर) होत आहे. आशिया कपच्या इतिहासात तब्बल 41 वर्षांनी दोन्ही  टीम फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभ्या टाकल्या आहेत. या स्पर्धेत यापूर्वी दोन्ही टीममध्ये दोन लढती झाल्या. दोन्ही सामन्यात भारतानं पाकिस्तानला सहज लोळावलं. आता फायनलमध्येही पाकिस्तानचा सुपडा साफ करत 'आशियाचे किंग' होण्याच्या तयारीनं भारतीय टीम मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत अपराजित असलेल्या टीम इंडियासाठी फायनलपूर्वी काळजीची बातमी आहे. भारतीय टीमला दुखापतींचा अडथळा सहन करावा लागतोय.

काय आहे दुखापतीचं अपडेट?

भारतीय टीममधील अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा हे तीन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याचं वृत्त आहे. टीम इंडियाचे बॉलिंग कोच मोर्ने मॉर्केलनं फायनलपूर्वी पत्रकारांशी बोलताना यावर महत्त्वाची माहिती दिली आहे. 

श्रीलंकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर मॉर्केलनं ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि ओपनर अभिषेक शर्मा यांच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी तिलक वर्माबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हार्दिकच्या फिटनेसचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. तर अभिषेक शर्मा ठीक आहे, असं मॉर्केलनं सांगितलं. 

( नक्की वाचा : 27 सेंच्युरी, 7885 रन्स! तरीही दुर्लक्ष का? टीम इंडियाच्या 'चक्रव्युहा'त अडकला 'अभिमन्यू' )
 

पहिल्याच ओव्हरनंतर सोडले मैदान

श्रीलंकेविरुद्ध बॉलिंग करत असताना हार्दिकनं पहिल्याच ओव्हरमध्ये मैदान सोडले होते. त्यानंतर सध्या फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा देखील क्रॅम्प्सच्या त्रासामुळे 10 व्या ओव्हरमध्ये मैदानातून बाहेर गेला.

तर तिलक वर्मा मागील मॅचमध्ये सिक्स वाचवताना जखमी झाला. ही घटना भारताची बॉलिंग सुरु असताना 18 व्या ओव्हरमध्ये घडली. अक्षर पटेल ती ओव्हर टाकत होता. त्याच्या या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा ऑलराऊंडर दासून शनाकाने मिड-विकेटवर सिक्सर मारला. त्यावेळी तिलक वर्माने उडी मारत सिक्स वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही आणि त्याला स्वतःलाही दुखापत झाली. त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com