Pratika Rawal World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलमीची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावलने न्यूझीलंड विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडीयममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकप 2025 चा 24 वा सामना रंगत आहे. प्रतिकाने या सामन्यात सोफी डिवाईनच्या गोलंदाजीवर चौकार मारून या फॉर्मेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. एकूण 23 इनिंगमध्ये प्रतिकाने ही चमकदार कामगिरी केली आहे. महिला वनडेत सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण करून फलंदाजांच्या लिस्टमध्ये प्रतिका पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
प्रतिकाने तिच्या डेब्युनंतर फक्त 304 दिवसातच असा कारनामा केला आहे. डेब्यूनंतर सर्वात कमी दिवसात एक हजार धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड आता प्रतिकाच्या नावावर करण्यात आला आहे. याआधी हा रेकॉर्ड लॉरा वोल्वार्ड्ट च्या नावावर होता. ज्यांनी 734 दिवसात अशी कामगिरी केली होती. प्रतिकाने 22 डिसेंबर 2024 ला डेब्यू केलं होतं. तर लॉरा वोल्वार्डटने तिचा पहिला सामना 7 फेब्रुवारी 2016 रोजी खेळला होता. तसच तिने हजार वनडे रन्स 10 फेब्रुवारी 2018 ला पूर्ण केल्या होत्या.
नक्की वाचा >> चावी हरवली..नो टेन्शन! तरुणाने फटाक्याचा भन्नाट जुगाड करून घराचं कुलूप तोडलं, व्हिडीओनं इंटरनेटवर केला धमाका
प्रतिकाच्या क्रिकेट करिअरबाबत या गोष्टी जाणून घ्या
प्रतिकाने वर्ष 2021 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून डेब्यू केलं होतं.तीन वर्षांपर्यंत दिल्लीसाठी खेळल्यानंतर, 2024 च्या देशांतर्गत क्रिकेटआधी ती रेल्वे टीमसोबत जोडली गेली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसाम विरोधात 155 चेंडूत 161 धावांची दमदार खेळी केल्यानंतर प्रतिका प्रकाशझोतात आली. 2023-24 च्या देशांतर्गत सीजनमध्ये तिने चमकदार कामगिरी करून आठ इनिंगमध्ये 411 धावा केल्या. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये प्रतिकाने भारतासाठी वेस्टइंडिज विरोधात वनडे डेब्यु केला. तिने सहाव्या वनडे सामन्यातच 129 चेंडूत 154 धावांची खेळी केली होती. हा तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा पहिला शतक होता.
नक्की वाचा >> KDMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा बडा नेता भाजपच्या गळाला?
महिला वनडेत सर्वात वेगवान 1000 धावा
23 - लिंडसे रीलर (Aus-W)
23 - प्रतिका रावल (IND-W)
25 - मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया-W)
25 - निकोल बोल्टन (ऑस्ट्रेलियाई-W)
27 - बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया-W)
27 - लॉरा वोल्वार्ड्ट (SA-W)