Anar Bomb Desi Jugaad Video : दिवाळीचा हंगाम सुरू होताच फटाक्यांची आतषबाजी होणार नाही, असं कसं होऊ शकतं. पण यावेळी दिवाळीत एका व्यक्तीने भन्नाट जुगाड करून घराचं कुलूप तोडलं. पठ्ठ्याने अनार बॉम्ब (पाऊस) फटाक्याला आग लावून असा काही जुगाड केला..ज्याचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फटाक्याच्या जुगाडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की,एक व्यक्ती कुलूपासमोर एक मोठा फटाका पेटवतो. जेव्हा फटाका पेटतो, तेव्हा त्याच्या ठिणग्यांनी ती जागा प्रकाशमय होते. म्हणजे फटाक्याचा जाळ इतका होतो की, 17 सेकंदानंतर कुलूप तुटतं.
फटाक्याच्या जुगाडाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
फटाक्याचा जुगाड यशस्वी झाल्यावर तो व्यक्ती म्हणतो, काम झालं..हा संपूर्ण 32 सेकंदाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @vickysinghexperiments नावाच्या यूजरने शेअर केला आहे. दोन दिवसांतच या व्हिडीओला 3 कोटींहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओला 2.7 लाखांपर्यंत लाईक्सही मिळाले आहेत. तसच 1600 हून अधिक लोकांनी व्हिडीओवर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, एका व्यक्तीने अनार बॉम्ब चिमट्याने पकडून तो फटाका पेटवतो. त्यानंतर फटाक्याला आग लागताच तो फटका कुलूपाजवळ नेतो आणि काही वेळानंतर तो कुलुप उघडला जातो.
नक्की वाचा >> शेतकऱ्यांमध्ये संताप! बैलाची कत्तल करणाऱ्या मांस तस्करांचा सुळसुळाट..'या' गावात घडली सर्वात भयंकर घटना!
इथे पाहा भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटलंय, आता चोरांनाही नवीन आयडिया मिळाली आहे. दुसऱ्या एकाने म्हटलं, या पद्धतीने उघडलं (lock breaking hack), तर संपूर्ण गावच येईल. तिसऱ्या यूजरने म्हटलं, भावा आता खरी दिवाळी साजरी होईल. दरम्यान, अनेक लोकांनी म्हटलं आहे की, अशाप्रकारचा खतरनाक जुगाड कोणीही करू नये. तसच घरातही असा प्रयोग करणे चुकीचं ठरेल. कारण अनार बॉम्ब एक स्फोटक पदार्थ आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.
नक्की वाचा >> Video : मला बोलू नको..1 धावेसाठी श्रेयस अय्यर अन् रोहित शर्मात जुंपली, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मज्जाच झाली!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world