Indian Womens Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यानंतर भारतीय महिला संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. त्याच बरोबर बक्षिसांचाही वर्षाव होत आहे. बीसीसीआयने घसघशीत बक्षिस जाहीर केले. ICC कडून ही विजेते म्हणून बक्षिस देण्यात आलं आहे. शिवाय प्रत्येक खेळाडूला त्या त्या राज्यांनीही बक्षिसं दिली आहेत. त्यात आता टाटा मोटर्सची ही भर पडली आहे. टाटा मोटर्सनही एक मोठं खास गिफ्ट विज्येत्या संघातील प्रत्येक खेळाडूला देण्याचे जाहीर केले आहे.
या ऐतिहासिक यशाच्या सन्मानार्थ देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने एक विशेष घोषणा केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ती येत्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी लॉन्च होणाऱ्या आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही 'टाटा सिएरा'ची पहिली बॅच भारतीय महिला क्रिकेट संघाला भेट म्हणून देणार आहे. या उपक्रमांतर्गत संघातील प्रत्येक खेळाडूला या एसयूव्हीचे टॉप मॉडेल प्रदान केले जाईल अशी घोषणा केली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन फीचर्सनी सजलेली ही कार त्या खेळाडूंना समर्पित आहे ज्यांनी वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला आहे असं टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा याबाबत घोषणा केली. ते म्हणाले की “भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या उत्कृष्ट खेळ आणि ऐतिहासिक विजयाने देशाला अभिमानाची भावना दिली आहे. त्याचे संपूर्ण देशालाच नाही तर जगाला कौतूक आहे.
ते पुढे म्हणतात त्यांचा प्रवास हा दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाच्या शक्तीचे प्रतीक आहे आणि हेच मूल्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्समध्ये आम्हाला अभिमान आहे की आम्ही या शूरवीर खेळाडूंना आणखी एक दिग्गज टाटा सिएरा भेट स्वरूपात देत आहोत. हा आमच्याकडून त्यांच्या जिद्दीला आणि देशाला दिलेल्या गौरवाला वाहिलेला एक खास सन्मान आहे. दोन दिग्गज, एक जिद्द, अनंत प्रेरणा. असं ते शेवटी म्हणतात. टाटा सिएरा ही जबरदस्त फिचर असलेली महागडी कार आहे. त्याची किंमत पंचवीस लाखा पेक्षा जास्त आहे.