PM Modi Meets womens cricket Team India : भारतातील चॅम्पियन टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. यानिमित्ताने टीमने ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट टीमची भेट घेतली. त्यांना अनेक प्रश्व विचारले, त्यांचं कौतुक केलं. विशेष म्हणजे महिला क्रिकेट खेळाडूंनाही यावेळी प्रश्व विचारण्याची संधी मिळाली. अनेक खेळाडूंनी पंतप्रधानांना आपल्या मनातील प्रश्न विचारला. या सर्वात एका प्रश्नाने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
क्रिकेटर हरलीन देओल हिची ओळख टीममध्ये खोडकर खेळाडू म्हणून केली जाते. हरलीनने मोदींना थेट त्यांचा स्किन केअर रुटिनचं विचारलं. ती म्हणाली, मोदीजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे... तुमचा स्किन केअर रुटिन काय आहे? तुम्ही खूप ग्लो करता. हा प्रश्न येताच सर्वत्र हशा पिकला. मोदीही मोठ्याने हसले. (PM Modi Meets womens cricket Team India)
Every Indian feels immense pride in Team India's World Cup victory. It was a delight interacting with the women's cricket team. Do watch! https://t.co/PkkfKFBNbb
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2025
पंजाबमधील मोहालीतील हरलीन सातवीत असल्यापासून क्रिकेट खेळते. हरलीनने बीए आणि एमए समाजशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. ती अभ्यासात चांगली होती आणि महाविद्यालयातील कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी व्हायची. क्रिकेट टीममधील तिच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ती आक्रमक उजव्या हाताची फलंदाज असून कधीकधी ती उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करते. 2021 मध्ये २० २० मध्ये हरलीनने घेतलेल्या acrobatic catch व्हायरल झाली होती.
हरलीनने विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले...
हरलीनने विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले, य़ा विषयावर माझं लक्ष गेलं नाही. मला सरकारमध्ये २५ वर्षे झालीत. देशवासियांचे आशीर्वाद मिळतात. त्याचाच परिणाम असेल कदाचित.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world