MI Vs CSK: अटीतटीच्या सामन्यात चेन्नईच ठरली सुपर, पहिल्या सामन्यात पराभवाची मुंबईची परंपरा कायम

रोहित शर्माकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तो पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला त्याल खाते ही उघडता आले नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
फोटो सौजन्य- आयपीएल

चेन्नईने आपल्या पहिल्याच सामन्या मुंबई इंडियन्सला धुळ चारली आहे.  मात्र मुंबईने दिलेल्या 156 धावांचे लक्ष्य गाठताना चेन्नईची मात्र चांगलीच दमछाक झाली. चेन्नईने विजयाचे लक्ष 20 व्या षटकात पूर्ण केले. धोनीला ही आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागले. चेन्नईने लक्षाचा पाठलाग करताना 6  विकेट गमावल्या. चेन्नईकडून सर्वाधिक 65 धावा रचिन रविंद्रने केल्या. तर मुंबईने आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची परंपरा कायम राखली.  मुंबई इंडियन्सने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीला आलेला राहुल त्रिपाठी अवघ्या दोन घावू करून आऊट झाला. त्याला दिपक चाहरने बाद केले. मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने रचिन रविंद्र बरोबर डाव सावरला. ऋतुराजने अर्धशतकी खेळी केली. त्याने 26 चेंडूत 53 धावा केल्या. त्यात त्याने सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्यानंतर आलेले शिवम दुबे आणि दीपक हुडा जास्त वेळ मैदानात राहू शकले नाहीत. त्यांनी अनुक्रमे नऊ आणि तीन धावा केल्या. मुंबईकडून विग्नेश पुथूर याने तीन विकेट घेतल्या.  रचिन रविद्रने अर्धशतक झळकवले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 त्या आधी चेन्नईने भेदक मारा केला होता. मुंबई इंडियन्सला चेन्नईने 155 धावांवर रोखले. सामना जिंकण्यासाठी चेन्नईपुढे मुंबईने 156 धावांचे लक्ष दिले होते. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 29 धावांची खेळी केली.  मुंबईकडून तिलक वर्माने 25 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या खेळीत त्याने  2 चौकार आणि 2 षटकार लगावले. याव्यतिरिक्त मुंबईच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ट्रेंडिंग बातमी - SRH Vs RR: रोमहर्षक लढतीत हैदराबादचा विजय, राजस्थानचा पराभव, दुबेची झुंझार खेळी व्यर्थ

सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टनने घेतलेला हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मुंबईच्या धावफलकावर एकही रन्स नसताना रोहित शर्माला शून्यावर आऊट करत पहिल्याच षटकात खलील अहमदने पहिला धक्का दिला. त्यानंतर मुंबईच्या डावाला उतरती कळा लागली. चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यासोबत खलील अहमदने 2, आणि अश्विनने 1 बळी घेतला. दिपक चाहरने शेवटी 15 चेंडूत 28 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 155 धावांचा टप्पा गाठता आला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - SRH Vs RR: 4,4,6,6.... हैदराबादमध्ये 'हेडचे तुफान! सर्वात जलद फिफ्टी ठोकली, जोफ्रा आर्चरची धुलाई

रोहित शर्माकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तो पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला त्याल खाते ही उघडता आले नाही. तो शुन्यावर बाद झाला. रोहित शर्मानंतर खलील अहमदने मुंबईच्या सलामी जोडीला रायन रिकेल्टलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर आर अश्विनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विल जॅक्सला आऊट करत मुंबईला तिसरा धक्का दिला. त्यानंतर मुंबईच्या विकेट या पडतच राहील्या. मुंबईने कसा तरी दिडशेचा टप्पा ओलांडला. 

Advertisement

Topics mentioned in this article