
IPL 2025 SRH Vs RR: आयपीएलच्या स्पर्धेतील दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेल्या 287 धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थानचा डाव 242 धावांवर आटोपला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थाननेही जोरदार झुंज दिली मात्र 44 धावांनी त्यांचा निसटता पराभव झाला.
आयपीएल 2025च्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. इशान किशनने झळकावलेले वादळी शतक तसेच ट्रॅव्हिस हेडच्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानसमोर 287 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र राजस्थानचा डाव 241 धावांवर आटोपला. राजस्थानकडून संजू सॅमसन, ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर आणि शुभम दुबे यांनी मोठी खेळी केली मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
Match 2. Sunrisers Hyderabad Won by 44 Run(s) https://t.co/ltVZAvHPP8 #SRHvRR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
संजू सॅमसनने 66 धावांची शानदार खेळी केली. त्याने 37 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार आणि 4 षटकार मारले. ध्रुव जुरेलने 35 चेंडूत 70 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. हैदराबादकडून हर्षल पटेल आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
तत्पुर्वी, सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सने घेतला. त्यानंतर जबरदस्त फलंदाजांची फौज असलेल्या हैदराबादच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. ट्रॅव्हिस हेड आणि ईशान किशनने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशान किशनने फक्त 45 धावात 100 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि सहा षटकार ठोकले. दुसरीकडे ट्रॅव्हिस हेडने चौकार षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 21 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world