DC Vs LSG: दिल्लीच्या आशुतोषची कमाल खेळी! हरलेला सामना फिरवला, लखनौचा पराभव

IPL 2025 LSG Vs DC: सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊच्या संघाने धावा करत दिल्लीसमोर 8 गडी गमावत 210 रन्सचे टार्गेट दिले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2025 LSG Vs DC: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये पार पडला. या अटीतटीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जाटंट्सचा अखेरच्या षटकात पराभव केला. खनौ जायंट्सने दिलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने अखेरच्या षटकात विजय मिळवला. आशुतोष शर्मा या सामन्याचा हिरो ठरला. त्याने तो 31 चेंडूत 66 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 5 षटकार लागले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लखनौच्या 210 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीला शार्दुल ठाकूरने जोरदार धक्का दिला. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात जॅक फ्रेझर मॅकगर्कला आऊट केले. त्यानंतर दिल्लीला आणखी दोन धक्के बसले. अभिषेक पोरेलच्या रूपाने दिल्लीला दुसरा धक्का बसला, त्यालाही शार्दुलनेच काटा काढला. मॅकगर्क-पोरेलनंतर समीर रिझवी स्वस्तात आऊट झाला आणि दिल्लीचा डाव गडगडला. 

दिल्ली कॅपिटल्सला ट्रेस्टन स्टब्सकडून खूप आशा होत्या, पण तोही लवकर आऊट झाला. 13 व्या षटकात, स्टब्सने प्रथम एम सिद्धार्थच्या चेंडूवर दोन षटकार मारले आणि नंतर तो बोल्ड झाला. स्टब्सने 22 चेंडूत 34 धावा केल्या. लखनौकडून शार्दुल ठाकूरने 2, मनिमरेश सिद्धार्थने 2, रवी बिश्नोईने 2 आणि दिग्वेश राठीने 2 धावा केल्या. हातातून गेलेला सामना अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने फिरला आणि दिल्लीने शानदार विजय मिळवला. 

तत्पुर्वी,  सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊच्या संघाने धावा करत दिल्लीसमोर 8 गडी गमावत 210 रन्सचे टार्गेट दिले होते. लखनऊकडून निकोलस पुरन आणि मिशेल मार्शने तुफान फटकेबाजी केली.निकोलस पूरनने 30 चेंडूत 75 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार आणि 7 षटकार मारले. तर मिचेल मार्शने 36 चेंडूत  6 चौकार आणि 6 षटकारांसह 72 धावा केल्या. 

Advertisement

DC Vs LSG: 6,6,6,6... मिचेल मार्शची स्फोटक खेळी, लखनऊचे दिल्लीसमोर 'इतक्या' धावांचे टार्गेट

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

Advertisement