जाहिरात

DC Vs LSG: 6,6,6,6... मिचेल मार्शची स्फोटक खेळी, लखनऊचे दिल्लीसमोर 'इतक्या' धावांचे टार्गेट

IPL 2025 LSG Vs DC: फलंदाजी करणाऱ्या लखनऊच्या संघाने धावा करत दिल्लीसमोर 210 रन्सचे टार्गेट दिले आहे. लखनऊकडून निकोलस पुरन आणि मिशेल मार्शने तुफान फटकेबाजी केली.

DC Vs LSG: 6,6,6,6... मिचेल मार्शची स्फोटक खेळी, लखनऊचे दिल्लीसमोर 'इतक्या' धावांचे टार्गेट

IPL 2025 LSG Vs DC: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये आयपीएलचा चौथा सामना होत आहे. विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या सामन्यात दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लखनऊला आठ गड्यांच्या मोबदल्यात 209 धावांवर रोखले. लखनऊकडून निकोलस पुरनने वादळी खेळी करत सर्वाधिक 75 धावा केल्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयपीएलच्या मैदानात आज  दिल्ली आणि लखनऊचा संघ आमने सामने येत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल करेल, तर लखनऊच्या संघाचे नेतृत्व  ऋषभ पंत करत आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊच्या संघाने धावा करत दिल्लीसमोर 8 गडी गमावत 210 रन्सचे टार्गेट दिले आहे. लखनऊकडून निकोलस पुरन आणि मिशेल मार्शने तुफान फटकेबाजी केली.

आजच्या सामन्यात  चाहत्यांच्या नजरा ऋषभ पंतवर होत्या मात्र तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर निकोलस पुरन आणि मिचेल मार्शने शानदार फलंदाजी केली. निकोलस पूरनने 30 चेंडूत 75 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार आणि 7 षटकार मारले. तर मिचेल मार्शने 36 चेंडूत  6 चौकार आणि 6 षटकारांसह 72 धावा केल्या. 

जेव्हा मिचेल मार्श आणि निकोलस पूरन फलंदाजी करत होते तेव्हा असे वाटत होते की लखनौ 250 धावांचा आकडा सहज गाठेल. पण यानंतर दिल्लीने चांगले पुनरागमन केले.  त्यानंतर लखनऊचा डाव गडगडला. . डेव्हिड मिलर 19 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने 3 आणि कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या.