दिल्लीने दिलेल्या 163 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरूवात चांगली झाली नाही. विराट कोहली बरोबर सलामीला आलेल्या जेकब बेथेल हा 12 धावा काढून बाद झाला. देवदत्त पाडिक्कल याला तर खातं ही ओळखता आलं नाही. तो शुन्यावर बाद झाला. तर कॅप्टन रजत पाटीदारलाही जास्त वेळ खेळपट्टीवर राहाता आलं नाही. तो सहा धावा काढून रन आऊट झाला. एकीकडे विराट कोहली हा सावध खेळी करत असताना दुसरी कृणाल पंड्या मात्र आक्रमक खेळ करत होता. त्याने आपले अर्धशतक ही पुर्ण केले. त्या पाठोपाठ विराट कोहलीनेही अर्धशतक झळकवले. विराट कोहली 51 रन्स करुन बाद झाला. बंगळुरूने हे लक्ष एकोणीसाव्या षटकात पूर्ण केले. कुलाण पांड्याने 73 धावांची खेळी केली. बंगळुरूने 6 विकेटने मॅच जिंकली
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा
दिल्ली कॅपिटल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या आयपीएलचा सामना रंगला. बंगळुरूने टॉस जिंकत प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला. दिल्लीकडून पोरेल आणि डू प्लेसी यांनी डावाची सुरूवात केली. दोघांची पहिल्या तीन षटकात 30 धाव ठोकल्या. ए पोरेल हा 11 चेंडूर 28 धावांची खेळू करून बाद झाला. हेजलवूडने त्याला बाद केले. त्याने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. तर ड्युप्लेसी 22 धावा करून बाद झाला. तर करूण नायर पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ चार धावा करता आला.
त्यानंतर आलेल्या लोकेश राहुलने संयमी आणि सावध खेळी केली. त्याने 39 चेंडूत 41 धावा केल्या. त्यात तीन चौकारांचा समावेश होता. अक्षर पटले, अशुतोष शर्मा यांना मोठी खेळी करता आली नाही. ट्रिस्टन स्टब्स याने शेवटच्या षटकात जोरदार फलंदाजी केली. त्याने 18 चेंडूत 35 धावांची खेळी केली. त्यात पाच चौकार आणि एक षटकार त्याने ठोकला. त्यामुळे दिल्लीला वीस षटकात 162 धावा तरी करता आल्या. सर्वाधिक धावा या लोकेश राहुलने केल्या. पण त्याला आक्रमक खेळ करता आला नाही. दिल्लीचे आठ फलंदाज बाद झाले.
बंगळुरूकडून भूवनेश्वर कुमार याने टिच्चून बॉलिंग केली. त्याने चार षटकात 33 धावांच्या बदल्यात 3 फलंदाजाना बाद केले. दुसऱ्या बाजून हेजलवूडने ही चांगली बॉलिंग केली. त्याने दोन फलंदाज बाद केले. तर यश दयाल आणि कृणाल पंड्या यांनी एक एक फलंदाज बाद केले. दिल्लीच्या एका ही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे बंगळुरू समोर वीस षटकात फक्त 163 धावांचे लक्ष ठेवण्यात आले.