जाहिरात

Shubman Gill : 'मी गेली 3 वर्ष..'. शुबमन गिलंनं सारा तेंडुलकरसह ब्रेकअपवर रहस्य उलगडलं, Video

Shubman Gill : 'मी गेली 3 वर्ष..'. शुबमन गिलंनं सारा तेंडुलकरसह ब्रेकअपवर रहस्य उलगडलं, Video
Shubman Gill on Relationship : शुबमन गिलनं रिलेशनशिपच्या चर्चेला उत्तर दिलं आहे.
मुंबई:

Shubman Gill on Relationship : टीम इंडियचा प्रमुख खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कॅप्टन शुबमन गिल (Shubman Gill) त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. तू लवकरच लग्न करणार आहेस का? असा थेट प्रश्न गिलला नुकताच आयपीएल मॅचमधील टॉसपूर्वी विचारण्यात आला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tenulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि गिलच्या कथित 'अफेयरचं' देखील नेहमी गॉसिप होत असतं. या सर्व चर्चांना पूूर्णविराम देणारं स्पष्टीकरण गिलनं दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला गिल?

शुबमन गिलनं 'द हॉलिडे इंडिया रिपोर्टर' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रिकेटसह वैयक्तिक आयुष्यातील विषयांवरील प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली आहेत. गिल आणि सारानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचबरोबर 23 वर्षांची टीव्ही स्टार अवनीत कौरला गिल डेट करत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. या सर्व विषयांना शुबमन गिलनं उत्तर दिलं आहे.

( नक्की वाचा : Shubman Gill :  गुजरातच्या विजयानंतर गिलचा विराटवर निशाणा ! 7 शब्दांची पोस्ट Viral )
 

शुबमन या मुलाखतीमध्ये म्हंटला की, 'मी 3 वर्षांपासून सिंगल आहे. माझ्याबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. माझं नाव अनेकांशी जोडण्यात आलंय. मी ज्या व्यक्तींनी आयुष्यात कधीही बघितलं नाही किंवा भेटलेलो नाही त्यांच्यासोबतही माझ्या नावाची चर्चा झाली आहे.

माझा सध्या व्यावसायिक कारकिर्दीवर पूर्ण फोकस आहे. माझ्या आयुष्यात सध्या अन्य कुणाला जागा नाही. आम्ही वर्षातील 300 दिवस व्यस्त असतो. त्यामुळे कुणाबरोबर वेळ घालवण्यासाठी फारच थोडा वेळ आहे,' असं सांगत शुबमननं रिलेशनशिपवरच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

IPL मध्ये दमदार कामगिरी

शुबमन गिल वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असला तरी त्याची क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2025 मधील 8 सामन्यात त्यानं 43.57 च्या सरासरीनं 305 रन्स केले आहेत. त्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 153.26 आहे. गिलनं गुजरात टायटन्सला दमदार सुरुवात करुन देण्याचं काम केलंय. त्याची टीम 8 पैकी 6 सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: