IPL 2025: 18 वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून आरसीबीने ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात विराटने 35 चेंडूत 43 धावांची संथ खेळी खेळली, तरीही बंगळुरूने दमदार गोलंदाजीच्या जोरावर आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकले. या विजयानंतर बंगळुरुसह पंजाबच्या संघांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरसीबीली किती रक्कम मिळाली?
आयपीएल 2025 चा चॅम्पियन बनल्याबद्दल आरसीबीला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. गेल्या वर्षीही कोलकाता नाईट रायडर्सना तीच बक्षीस रक्कम मिळाली होती. एकीकडे बंगळुरूला 20 कोटी रुपये मिळाले, तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या संघाला म्हणजेच पंजाब किंग्सवरही पैशांचा पाऊस पडला. उपविजेतेपद मिळवल्याबद्दल पंजाबला 13 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स देखील रिकाम्या हाताने परतणार नाहीत, त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अनुक्रमे 7कोटी आणि 6.5 कोटी रुपये मिळतील.
या खेळाडूंवरही बक्षीसांचा वर्षाव:
ऑरेंज कॅप साई सुदर्शन (759 धावा, 10 लाख)
पर्पल कॅप प्रसिध कृष्णा (25 विकेट, 10 लाख)
सर्वाधिक षटकार: निकोलस पूरन (40 षटकार, 10 लाख)
सर्वाधिक चौकार: साई सुदर्शन (88 चौकार, 10 लाख)
मोस्ट वेल्यूबल प्लेयर: सूर्यकुमार यादव (15 लाख)
प्लेअर ऑफ द फायनल: कृणाल पंड्या (10 लाख रुपये)
उदयोन्मुख खेळाडू: साई सुदर्शन (759 धावा, 20 लाख)
सुपर स्ट्रायकर: वैभव सूर्यवंशी (206.55, 10 लाख)
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. बंगळुरूने प्रथम खेळताना 190 धावांचा मोठा स्कोअर केला. आरसीबीच्या एकाही खेळाडूने अर्धशतक झळकावले नाही हे आश्चर्यकारक होते, तरीही संघ 190 धावसंख्या गाठू शकला. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 184 धावा करू शकला. जोश हेझलवूड 4 षटकांत 54 धावा देऊन महागडा ठरला, परंतु बंगळुरूच्या गोलंदाजीने कहर केला, ज्याचे विराट कोहलीनेही कौतुक केले.