
Virat Kohli New Record : टीम इंडियाचा महान क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. आयपीएल स्पर्धा देखील त्याला अपवाद नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) यांच्यातील आयपीएल फायनलमध्ये (IPL 2025 Final) विराटनं आणखी एक रेकॉर्ड केला. विराटनं पहिला फोर लगावताच हा रेकॉर्ड केला. त्यानं शिखर धवनला मागं टाकलं.
आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये आरसीबीचा सामना पंजाब किंग्जशी (PBKS) आहे. पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याता निर्णय घेतला. आरसीबीकडून ओपनिंगला आलेल्या विराटनं 3.1 ओव्हरमध्ये इल जेमीसनच्या (Kyle Jamieson) बॉलवर त्याच्या इनिंगमधील पहिला फोर लगावला.
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने ३.१ षटकात काइल जेमिसनच्या (Kyle Jamieson) चेंडूवर आपल्या डावातील पहिला चौकार मारला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिखर धवनला टाकले मागे
विराट कोहलीने या फोरच्या मदतीने आयपीएलमध्ये एक खास कामगिरी केली. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक फोर मारणारा बॅटर ठरला. त्याने शिखर धवनला मागे टाकले आहे.
विराट कोहलीने आपल्या 267 व्या मॅचमध्ये ही कामगिरी केली. कोहलीच्या नावावर आता 771 फोर जमा झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिखर धवनने 222 मॅचमध्ये 768 फोर मारले आहेत. याआधी तो अव्वल स्थानावर होता. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 Final : नवरा की RCB? या महिलेच्या अटीनं सर्वच चकित! प्रिय विराट, आता तूच सांभाळ... )
आयपीएलमध्ये सर्वाधिक फोर मारणारे बॅटर:
विराट कोहली - 771
शिखर धवन - 768
डेव्हिड वॉर्नर - 663
रोहित शर्मा - 640
अजिंक्य रहाणे - 514
पंजाबला 191 रन्सचं टार्गेट
आयपीएल फायनलमध्ये आरसीबीनं पंजाबला जिंकण्यासाठी 191 रन्सचं टार्गेट ठेवलं. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या आरसीबीनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 190 रन्स केले. आरसीबीकडून विराट कोहलीनं सर्वात जास्त 43 रन्स काढले. विराटनं 35 बॉलमध्ये 3 फोरच्या मदतीनं 43 रन्स केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world