IPL 2025: KKR चे स्पर्धेतील आव्हान धोक्यात, चेन्नईने केला पराभव

कोलकाला नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य राहाणेने टॉस जिंकला. त्यानंतर त्याने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
Read Time: 3 mins
फोटो सौजन्य- आयपीएल

कोलकाताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात चांगली झाली नाही. आयुश म्हात्रे हा पहिल्याच ओव्हरमध्ये शुन्यावर बाद झाला. डेव्बन कॉन्वे याला ही फार काही करता आला नाही. त्यानेही म्हात्रे प्रमाणे शुन्य धावा केल्या. मात्र उर्विल पटेल यांने फटकेबाजी केली. पण तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याने 11 चेंडूत 31 धावा ठोकल्या. पण हर्षीत राणाने त्याला ही बाद केले. या आक्रमक खेळीत त्याने चार सिक्स ठोकले. त्यानंतर आर आश्विन, रवींद्र जडेजा यांनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. त्यामुळे पाच षटकात पाच आऊट 60 अशी अवस्था चेन्नईची झाली होती. त्यानंतर देवाल्ड ब्रेव्हिस याने अर्धशतकी खेळी केली. शिवम दुबे बरोबर त्याने चेन्नईला विजयाच्या जवळ नेले. मात्र तो ही बाद झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला आठ धावांची गरज होती. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने सिक्स मारत चेन्नईचा विजय निश्चित केला. चेन्नईने कोलकाताचा दोन विकेटने पराभव केला. वीस ओव्हरमध्ये आठ गड्यांच्या बदल्यात चेन्नईने 183 धावा केल्या.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोलकाला नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य राहाणेने टॉस जिंकला. त्यानंतर त्याने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. प्ले ऑफमध्ये खेळण्यासाठी कोलकाताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे होते. अशा स्थितीत कोलकाताने 20 षटकात 179 धावा केल्या. चेन्नई समोर कोलकाताने 180 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावा उभ्या करताना कर्णधार अजिंक्य राहाणे,मनिष पांडे आणि आंद्रे रसेल यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. या फलंदाजाना वगळता कोलकाताचा एकही फलंदाज प्रभावी बॅटींग करू शकला नाही. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Rohit Sharma : रोहित शर्माचा इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय, टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाताची सुरूवात तेवढी चांगली झाली नाही. रहमानुल्ला गुरबाझ हा केवळ 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर सुनील नारायण देखी बाद झाला. तो मोठी धावसंख्या उभारण्यास अयश्वी झाला. त्यानंतर अजिंक्य राहाणेने डाव सावरला. त्याने 33 चेंडूत 48 धावा केल्या. यात दोन सिक्स आणि चार फोर लगावले. त्याला मनिष पांडेची साथ मिळाली. मनिषने 28 चेंडूत 36 धावा केल्या. तर आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. त्याने 21 चेंडूत 28 धावा केल्या. त्यात त्याने तीन सिक्स मारले. रिंकू सिंह या सामन्यातही आपली छाप पाडू शकला नाही. अखेर 6 फलंदाजांच्या बदल्या कोलकाताने 179 धावा केल्या. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे मुंबई इंडियन्सची मॅच संकटात? वाचा काय आहे सत्य

चेन्नईकडून नूर अहमद हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने आपल्या चार षटकात 31 धावा देत 4 जणांना आऊट केले. अंशुल कंबोज आणि रवींद्र जाडेज यांनी प्रत्येकी एक फलंदाजाला बाद केले. अन्य एका ही गोलंदाजाला फलंदाजाला आऊट करण्यात अपयश आले. आर आश्वीनने तीन ओव्हरमध्ये आठरा धावा देत कोलकाता फलंदाजांवर अंकूश ठेवला होता. पण त्याला एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. 

Advertisement