जाहिरात

IPL 2025 : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे मुंबई इंडियन्सची मॅच संकटात? वाचा काय आहे सत्य

IPL 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) एक मॅच संकटात सापडलीय, असा दावा करण्यात येत आहे. या दाव्यामधील सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

IPL 2025 : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे मुंबई इंडियन्सची मॅच संकटात? वाचा काय आहे सत्य
मुंबई:

पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशवादी हल्ल्याला भारतानं चोख उत्तर दिलं आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे. भारतीय लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) 70 दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचबरोबर 60 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील या तणावाचा फटका आयपीएल 2025 ला देखील फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) एक मॅच संकटात सापडलीय, असा दावा करण्यात येत आहे. या दाव्यामधील सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणती मॅच संकटात?

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (MI vs PBKS) ही 11 मे रोजी होणारी मॅच संकटात सापडली आहे. आयपीएलच्या 'प्ले ऑफ' साठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही मॅच हिमाचल प्रदेशमधील धरमशालामध्ये होणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतामधील विमानतळं बंद करण्यात आली आहेत. त्यामध्ये धरमशाला , चंदीगड, श्रीनगर तसंच अमृतसर या विमानतळाचा समावेश आहे.

( नक्की वाचा : Operation Sindoor: भारताचा एअर स्ट्राईक पाहून PSL खेळत असलेल्या इंग्लंडच्या खेळाडू घाबरला! म्हणाला.. )

मुंबई इंडियन्सची गुजरात टायटन्स विरुद्ध मॅच मंगळवारी रात्री झाली. त्यानंतर मुंबईची टीम या मॅचसाठी गुरुवारी धरमशालामध्ये दाखल होणार होती. पण, चंदीगड आणि धरमशालाचे विमानतळ बंद असल्यानं आता टीमला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. त्यामुळे ही मॅच रद्द होऊ शकते असा दावा काही सोशल मीडियातील पोस्टमधून करण्यात आला होता. पण, बीसीसीआयनं याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय आहे सत्य?

बीसीसीआयच्या सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीचा कोणताही परिणाम आयपीएलचे वेळापत्रक तसंच पुढील सामन्यांवर होणार नाही. आयपीएलचे पुढील सामने नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. बीसीसीआय या परिस्थितीबाबत सुरक्षा यंत्रणांशी संपर्कात असल्याचं देखील या सूत्रांनी स्पष्ट केलंय.

त्याचबरोबर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा धरमशालामध्ये होणारा सामना मुंबईमध्ये खेळवला जाऊ शकतो, अशी माहिती देखील या सूत्रांनी दिली आहे. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धरमशालामध्ये होणाऱ्या सामन्याचे ठिकाण देखील बदलले जाऊ शकते, अशी माहिती देखील या सूत्रांनी दिलीय. 

मुंबई इंडियन्सचा गुरुवारी झालेल्या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सनं 3 विकेट्सनं पराभव केला. मुंबईचा या सिझनमधील हा पाचवा पराभव आहे. मुंबई इंडियन्सचे सध्या 12 मॅचनंतर 14 पॉईंट्स आहेत. तर पंजाब किंग्जचे 11 मॅचनंतर 15 पॉईंट्स आहेत. 'प्ले ऑफ' च्या शर्यतीमध्ये आपलं स्थान भक्कम करण्यासाठी दोन्ही टीम्सना रविवारी (11 मे) होणारी मॅच जिंकणे आवश्यक आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com