कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यात रोमांचं होता. रोमहर्षक सामन्यात कोलकाना हा सामना फक्त एका रन्सने जिंकला. कोलकाताने दिलेल्या 206 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात चांगली झाली नाही. शतकवीर वैभव सुर्यवंशी या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला फक्त 4 धावा करता आल्या. त्यानंतर आलेला कुणाल सिंग राठोडला तर भोपळाही फोडता आला नाही. यशस्वी जैसवालने 21 चेंडूत 34 धावा केल्या. ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा यांनीही कुणालचाच कित्ता गिरवला. त्यांनाही आपलं खातं उघडता आलं नाही. ते लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. कर्णधार रियान परागने मात्र एक बाजू लावून धरली होती. रियान परागने 95 धावा केल्या त्याचे शतक हुकले. तो राजस्थानकडून एकाकी लढला. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्याने 95 धावांच्या खेळीत 8 सिक्स आणि सहा फोर लगावले. राजस्थानला 205 धावा करता आल्या. शुभम दुबेने सामन्याला शेवटी कलाटणी दिली होती. पण त्याचे प्रयत्न एक रन्सने तोकडे पडले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात कोलकाताचा कॅप्टन अजिंक्य राहाणेने टॉस जिंकला. त्यानंतर प्रथम बॅटींग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कोलकाताची सुरूवात चांगली झाली नाही. सुनील नारायण हा 11 धावा करुन बाद झाला. कोलकाताकडून आंद्रे सरेलने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्या केवळ 25 चेंडूत त्यांना काढल्या. या खेळीत आंद्रेने 6 सिक्स आणि 4 फोर लगावले. त्याच्या या वादळी खेळी मुळे कोलकाताला 20 षटकात 206 धावा करता आल्या.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: आयपीएलचा किंग विराट! कुणालाही जमलं नाही ते करुन दाखवलं, नवा इतिहास रचला
कोलकाताकडून रहमानुल्ला गुरबाझ याने 35 धावा केल्या. तर कर्णधार अजिंक्य राहाणेनं 30 धावा केल्या. अंगकृष्ण रघुवंशीने 31 चेंडूत 44 धावा केल्या. रिंकू सिंहनेही शेवटच्या षटकात सहा चेंडूंचा सामना करत 19 धावा फटकवल्या. त्यात दोन षटकारांचा समावेश होता. कोलकाताना चार गडी गमावत 206 धावा केल्या. गेले काही सामने राजस्थान आणि कोलकाता पराभूत होत आहेत. त्यामुळे दोघांसाठीही हा सामना महत्वाचा होता.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : आयुष म्हात्रे आणि जडेजाची फटकेबाजी व्यर्थ, RCB चा CSK वर निसटता विजय
जोफ्रा आर्चर, युधविर सिंग, महीश थीकशाना आणि रियान पराग यांनी राजस्थानकडून प्रत्येकी एक विकेट घेतली. राजस्थानच्या बॉलर्सला कोलकाताच्या फलंदाजांवर अंकूश ठेवता आला नाही. त्यामुळे 206 धावा कोलकाताने ठोकल्या. कोलाकाताच्या सर्व फलंदाजांना छोटी पण फायदेशीर खेळी संघासाठी केली. त्यामुळे त्यांना 206 धावा उभारत्या आल्या.दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा होता.