
आयपीएल 2025 मधील 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Royal Challengers Bengaluru Vs Chennai Super Kings) यांच्यात झाला. या मॅचमध्ये आरसीबीनं सीएसकेला 214 रन्सचं आव्हान दिलं होतं. सीएसकेनं हे टार्गेट पूर्ण करण्याचा निकारानं प्रयत्न केला. पण, त्यांचा फक्त 2 रननं पराभव झाला.
सीएसकेकडून 17 वर्षांच्या आयुष म्हात्रेनं सर्वांनाच प्रभावित केले. ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानं बदली खेळाडू म्हणून टीममध्ये आलेल्या आयुषनं आरसीबीच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. आयुषनं फक्त 25 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. आयुष आणि रविंद्र जडेजाची जोडी चांगलीच जमली. जडेजानं फक्त 29 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकवली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयुषची सेंच्युरी फक्त 6 रननं हुकली. त्यानं 48 बॉलमध्ये 9 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 94 रन काढले. आयुषनं जडेजासोबत तिसऱ्या विकेटसाठी 114 रनची भागिदारी केली.
रोमारियोची फटकेबाजी
यापूर्वी आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना आरसीबीने 5 आऊट 213 रन केले. रोमारियो शेपर्डची (Romario Shepherd) आक्रमक हाफ सेंच्युरी हे आरसीबीच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. रोमारियोनं फक्त 14 बॉलमध्ये नाबाद 53 रन केले. विराट कोहलीनं 33 बॉलमध्ये पाच सिक्स आणि पाच फोरच्या जोरावर 62 रन काढले. तर बेथेलनं 33 बॉलमध्ये 55 रन केले. बेथेल आणि विराटनं पहिल्या विकेटसाठी 97 रनची पार्टरनरशिप केली.
( नक्की वाचा : India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही? )
रोमारियो शेपर्डनं खलिल अहमदच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीनं 33 रन काढले. शेपर्डनं आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान हाफ सेंच्युरी केली.
Are you not entertained? 🤩
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
Romario Shepherd thrilled the M. Chinnaswamy Stadium with a 'blink and you miss' knock 🫡🔥
Updates ▶ https://t.co/I4Eij3ZNlN#TATAIPL | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/uPDjTUpOvY
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world