LSG vs PBKS: पंजाबची बल्ले बल्ले! लखनौवर मिळवला विजय

लखनौ विरुद्ध पंजाब सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकत प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
फोटो सौजन्य- आयपीएल

पंजाबने दिलेल्या 236 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात चांगली झाली नाही. मिचेल मार्श खातं ही न उघडता तंबूत परतला. तर एडन मार्करम ही जास्त काळ खेळपट्टीवर टिका धरू शकला नाही. त्याला 13 धावा करता आल्या. निकोलस पूरनकडून लखनौला अपेक्षा होती. पण तोही अपयशी ठरला. तो सहा धावंवर बाद झाला. त्यानंतर सर्व नजरा या कर्णधार ऋषभ पंत याच्याकडे होत्या. पण त्याने ही निराशा केली.  17 चेंडूत 18 धावा करुन तो ही आऊट झाला. अर्शदीप सिंगने लखनौला सुरूवातीचे धक्के दिले. त्याने तीन जणांना बाद केले. त्यामुळे सात ओव्हर्समध्येच लखनौची स्थिती 4 बाद 58 झाली होती.  डेव्हिड मिलर ही फार काही करू शकला नाही.  73 धावांतच लखनौची आर्धी टीम तंबूत परतली होती. त्यानंतर आयुष बडोनी आणि अब्दुल समद यांनी संघर्ष केला. समद 24 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर बडोनीने आपलं अर्ध शतक पूर्ण केलं, त्याने 74 धावा केल्या. पण संघाला तो विजय मिळून देवू शकला नाही. लखनौला 200 धावा करता आल्या. त्यांचे सात  फलंदाज बाद झाले. पंजाबने 37 धावांनी विजय मिळवला.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लखनौ विरुद्ध पंजाब सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकत प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबला बॅटींगसाठी निमंत्रित करण्यात आलं. पंजाबने जोरदार बॅटींग करत 20 षटकात 236 धावा ठोकल्या. प्रभसिमरन सिंग याने जबरदस्त बॅटींग करत 48 चेंडूत 91 धावा केल्या. या खेळीत त्याने सात सिक्स आणि सहा चौकार लगावले. प्रभसिमरन बरोबर जॉश इंग्लिस याने ही अवघ्या 14 चेंडूत 30 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर नेही 25 बॉलमध्ये 45 धावा करत प्रभसिमरनला चांगली साथ दिली. 

Advertisement

ट्रेंडींग बातमी - KKR vs RR: रियान पराग एकाकी लढला, नाईट रायडर्सकडून राजस्थानचा फक्त 1 रन्सने पराभव

शेवटच्या षटकांमध्ये नेहल वाधेरा, शशांक सिंग मार्क स्टोइनिस यांनी धुवाधार बॅटींग केली. त्यामुळे पंजाबने वीस षटकात तब्बल 236 धावा केल्या लखनौ समोर विजयासाठी 237 धावांचे लक्ष ठेवले. लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश रथी यांनी दोन दोन बॅट्समनला आऊट केले. अन्य बॉलर्सला आपली छाप पाडता आली नाही. शिवाय लखनौचे बॉलर्स पंजाबच्या फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: आयपीएलचा किंग विराट! कुणालाही जमलं नाही ते करुन दाखवलं, नवा इतिहास रचला

पंजाबकडून अर्थदीप सिंग याने प्रभावी बॉलिग करत लखनौला सुरूवातीलाच तीन धक्के दिले. त्यातून लखनौची टीम शेवटपर्यंत सावरू शकली नाही. त्यांचे एकामागून एक फलंदाज बाद होत गेले. पंजाबच्या या विजयामुळे त्यांच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबची टीम सरस कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे ऋषभ पंतला अजूनही सुर गवसलेला दिसत नाही. 
    

Advertisement