LSG vs SRH: हैदराबादचा लखनौवर दमदार विजय, ऋषभ पंतची टीम अडचणीत

सनराझर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग टाकण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
Read Time: 2 mins
फोटो सौजन्य- आयपीएल

लखनौने दिलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरूवात चांगली झाली नाही. अथर्व तायडे हा 13 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशांत किशन यांनी डाव सावरला. अभिषेक शर्माने 20 चेंडूत 59 धावा ठोकल्या. त्यात सहा सिक्स आणि चार चौकारांचा समावेश होता. तो 59 धावा काढून बाद झाला. अभिषेकच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने आठ ओव्हर्सच्या आतच 100 धावांचा पल्ला ओलांडला होता. त्यानंतर इशांत किशनही 35 धावा करून बाद झाला. त्याला चांगल्या सुरूवातीनंतर मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर मात्र क्लासेन आणि मेंडिस यांनी चांगली भागिदारी करत हैदराबादला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र क्लासने 47 धावांवर बाद झाला. अखेर 19 व्या षटकात हैदराबादने विजय मिळवला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सनराझर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय लखनौच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. लखनौचे ओपनिंग बॅट्समन मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी 10 ओव्हर्समध्ये 115 धावांची कडक सलामी दिली. मिचेल मार्शने 39 चेंडूत 65 धावा केल्या. तर एडन मार्करमने 38 चेंडूत 61 धावा ठोकल्या.  कर्णधार ऋषभ पंत या सामन्यात ही अपयशी ठरला. त्याला फक्त सात धावा करता आल्या. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - LSG vs SRH : मलिंगाची सुपरमॅन कमाल, ऋषभ पंत पुन्हा स्वस्तात आऊट, संजीव गोयंकांची प्रतिक्रिया Viral

त्यानंतर आलेल्या निकोलस पूरन याने जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने 26 चेंडूत 45 धावा केल्या. पण आयुष बडोनी, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, रवि विश्नोई, आकाश दिप यांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावण्याचं काम केलं. या पैकी एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. लखनौने 20 षटकात 7 फलंदाजांच्या बदल्यात 205 केल्या. त्यामुळे हैदराबाद समोर 206 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. हैदराबादकडून एशान मलिंग याने दोन विकेट घेतल्या. तर हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येक एक फलंदाजाला बाद केले. 

Advertisement