जाहिरात

LSG vs SRH : मलिंगाची सुपरमॅन कमाल, ऋषभ पंत पुन्हा स्वस्तात आऊट, संजीव गोयंकांची प्रतिक्रिया Viral

LSG vs SRH IPL 2025:  इंडियन प्रीमियर लीग 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतनं सपशेल निराशा केली आहे.

LSG vs SRH : मलिंगाची सुपरमॅन कमाल, ऋषभ पंत पुन्हा स्वस्तात आऊट, संजीव गोयंकांची प्रतिक्रिया Viral

Sanjiv Goenka Reaction on Rishabh Pant Wicket LSG vs SRH IPL 2025:  इंडियन प्रीमियर लीग 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतनं सपशेल निराशा केली आहे. लखनौसाठी महत्त्वाच्या असलेल्या लढतीमध्ये पंत फेल गेला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तो फक्त 7 रन काढून आऊट झाला. पंचनं सहा बॉलचा सामना केला. तो इशान मलिंगाच्या स्लो यॉर्करवर त्याच्याकडंच कॅच देऊन परतला.

ऋषभ पंतनं निराशा केल्यानंतर लखनौ टीमचे मालक संजीव गोयंका यांना निराशा लपवता आली नाही. पंत खेळत असताना स्टँडवर उभे असलेले गोयंका तो आऊट झाल्यानंतर बाहेर जाताना कॅमेऱ्यात कैद झाले. पंतला गेल्या वर्षी झालेल्या ऑक्शनमध्ये लखनौनं तब्बल 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. पण, त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यानं आत्तापर्यंत 13 मॅचमध्ये फक्त 135 रन केले आहेत. 

सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. लखनौला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी या सिझनमधील सर्व चार सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर अन्य मॅचच्या निकालांकडेही लक्ष ठेवावं लागेल. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा फास्ट बॉलर विल ओ रुरकेनं लखनौकडून पदार्पण केलं. 

लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 2025 रन केले. मिचेल मार्शनं (Mitchell Marsh) सर्वात जास्त 65 रन केले. त्यानं 39 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं हा स्कोअर केला. तर एडन मारकरमनं (Aiden Markram) 38 बॉलमध्ये 61 रन्सची खेळी केली. मार्श-मारक्रम जोडीनं पहिल्या विकेटसाठी 63 बॉलमध्ये 115 रन्सची पार्टरनरशिप केली. 

( नक्की वाचा : भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला त्यावेळी माझे आई-वडिल, KKR च्या खेळाडूचा गौप्यस्फोट! क्रिकेट विश्वात खळबळ )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com